नितीन काळे यांची भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदी वर्णी रिपोर्टर: उस्मानबाद भाजपच्या जिल्हाअध्यक्ष पदी नितीन काळे यांची निवड झाली असुन काळे या पुर्वी ही जिल्हाध्यक्ष पदावर होते.भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीची मुदत काही दिवसापुर्वीच संपली होती मात्र विधानसभेच्या निवडुकीमुळे ही निवड पुढे ढकलण्यात आली होती.जिल्हाध्यक्ष पदाची माळ कुणाच्या गळयात पडणार या विषयी तर्कवितर्क मांडले जात असतानाच काळे यांची निवड झाली आहे.नितीन काळे हे या पुर्वी जिल्हाध्यक्ष असताना जिल्हयामध्ये भजपाची मोट बांधण्यात त्यांना चांगले यश मिळाले होते.त्यामुळे पुन्हा काळे यांची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.काळे यांच्या निवडीवेळी  आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार सुजितसिंह ठाकुर,आॅड मिलींद पाटील,दत्ता कुलकर्णी,अणिल काळे,सुधिर पाटील,खंडेराव चौरे,अविनाश कोळी,अदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या