वकील व्हॉलीबॉल संघातर्फे नगराध्यक्ष चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन


रिपोर्टर:-दरवर्षी प्रमाणे वकील व्हॉलीबॉल संघाने याही वर्षी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावर्षी स्पर्धा नगराध्यक्ष चषक असणार आहेत.वकील व्हॉलीबॉल संघ व नगराध्यक्ष मा मकरंद राजेनिंबाळकर यांच्यावतीने आयोजन केले आहे.
स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस-31000 रु,दुसरे-21000,तिसरे-15000,चौथे 11000 रु,पाचवे-9000 रु ,सहावे -8000 रु ,सातवे-7000 रु,आठवे 6000 रु  अशी एकूण 16 बक्षिसे असणार आहेत.सोबतच आकर्षक असा नगराध्यक्ष चषक असणार आहे.
या स्पर्धेचे हे सातवे वर्ष आहे.या सामन्यासाठी राज्यभरातून पुणे,सोलापूर,सांगली,सातारा,जालना,नाशिक,औरंगाबाद, लातूर,बीड,अहमदनगर तसेच राज्याबाहेरून दानवड कर्नाटक,दिल्ली,राजस्थान येथून संघ येणार आहेत,स्पर्धेची नोंदणी सुरू झाली असून आतापर्यंत 40 संघांनी नोंदणी केली आहे.
 या स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह समोर उस्मानाबाद येथे होणार असून त्यासाठीची तयारी सुरू झालेली आहे. या स्पर्धेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू,व्हॉलीबॉल संघ व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा असे आवाहन वकील व्हॉलीबॉल संघातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या