रिपोर्टर: उमरगा तालुक्यातील मुरूम येथिल विठठसाई कारखाण्याची निवडणुक सलग चैथ्यांदा बिनविरोध पार पडली.कारखाण्याचे सर्वच 21 संचालक बिनविरोध निवडुन आल्यावर अध्यक्ष व उपाध्यक्षच्या निवडीसाठी दि.13 फेब्रुवारी राजी.बैठक घेण्यात आली.यावेळी पिठासिन अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी तथा दंड अधिकारी विठठल उदमले तर सहाययक निवडणुक निर्णायक अधिकारी शहापुरकर यांनी काम पाहीले.अध्यक्ष पदासाठी कॉग्रेसचे प्रदेश कार्यध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.तर उपाध्यक्ष पदासाठी सादिकसाहेब काझी यांचा अर्ज दाखल झाला. दोन्ही पदासाठी एक एक अर्ज आल्याने ही निवडनुक बिनविरोध झाल्याचे जाहीर करण्यात आले.
निवड झाल्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष म्हणाले की ही निवडनुक बिनविरोध करूण सर्व सदस्यांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखवला आहे.आम्ही सर्व ससस्य आणि सभासदाचे हित डोळयासमोर ठेवून काम करू तसेच कारखाण्याच्या पांचवार्षीक बिनविरोध निवडीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या