त्यागमूर्ती माता रमाई यांना भूम शहरात ठिकठिकाणी अभिवादन:
भूम रिपोर्टर 
भूम-येथील गोलाई चौकामध्ये त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सकाळी प्रथमता रमाईच्या प्रतिमेचे पूजन उपासक अजिनाथ लगाडे व नारायण म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नगरसेविका सारिका थोरात यांच्या हस्ते ही पूजन करण्यात आले,तर ध्वजारोहण राणी सोनवणे कृषी सहाय्यक भूम यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी भूम शहरातील बहुजन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गोलाई चौकामध्ये भव्य असा मंडप करण्यात आला होता यात माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून संध्याकाळी भीमनगर येथून मुख्य रस्त्याने रमाईच्या तैल चित्राची मिरवणूक काढण्यात आली,मोठ्या उत्साहात बँड बाजा वाद्यवृंदा सह काढण्यात आली या कार्यक्रमाला सुनील थोरात,भागवत शिंदे,अमोल शिंदे, के एन थोरात,महावीर बनसोडे, शिवाजी पायाळ,स्वप्नील जनराव, रोहित गायकवाड,कौशलला बनसोडे,शांताबाई सोनवणे,सरोज शिंदे,सरिता शिंदे,कावेरी टेकाळे, यांच्यासह भीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे प्रबुध्द गायकवाड,सिद्धोधन सरवदे, विशाल गरड,अमित लिंगमोरे, शुभम गरड, सिद्धार्थ गायकवाड, प्रतीक सितापे, केतन भोसले यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मुकुंद लगाडे  यांनी मानले.
दरम्यान येथील भीम नगर मध्ये रमाईंना अभिवादन करण्यात आले यावेळी मालन इंगळे लताताई थोरात संगीता लगाडे यांच्यासह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रमाई नगर कसबा इंदिरानगर येथेदेखील अभिवादन करण्यात आले तसेच तालुक्यातील हाडोंग्रि येथेही अभिवादन करण्यात आले यावेळी प्रतिमा पूजन वंदना टेकाळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला सुरेखा लोमटे,अश्विनी टेकाळे, शीतल लोंमटे,परेगा टेकाळे,दिक्षा टेकाळे,वनिता टेकाळे,जयश्री लोमटे,निलेश टेकाळे,शरद कसबे, गौतम टेकाळे,अशोक टेकाळे, संदीप टेकाळे,अर्जुन टेकाळे, बालाजी लोंढे हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या