राज्यस्तरीय इतिहास परिषदेत माधवराव पाटील महाविद्यालयाचा मनोज हावळे सर्व द्वितीय.......      रिपोर्टर:मुरुम,

 येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाचा इतिहास विषयाचा बी.ए.भाग प्रथम वर्षाचा मनोज हावळे यांने सोलापूर येथील संगमेश्वर महाविद्यालयात आयोजित १७ वे राज्यस्तरीय इतिहास परिषद मंगळवार(ता.४)रोजी पार पडली.या परिषदेत मनोज यांनी 'उमरगा तालुक्यातील प्राचीन ऐतिहासिक शिवमंदिरे'या विषयावर संशोधन पेपर सादर केला होता.या संशोधनाला द्वितीय क्रमांकाचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.तर योगेश पांचाळ याने बौद्धधर्म प्रसारातील सम्राट अशोकाची भूमिका याविषयावर पेपर सादर केला.यावेळी प्राचार्य चंद्रकांत चव्हाण यांच्या हस्ते हावळे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी प्राचार्य डॉ.रामचंद्र आवटे,प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, इतिहास संशोधक नितीन अनवेकर,डॉ.एन.एस.सोनटक्के,डॉ.न.भा.काकडे आदिंच्या प्रमुख उपस्थिती होती.या संशोधक विद्यार्थ्यांना इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. शीला स्वामी यांनी मार्गदर्शन केले.त्यांच्या या यशाबद्ल प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,डॉ.विलास खडके,डॉ.अरुण बावा,डॉ.अविनाश मुळे,डॉ.विठ्ठल कांबळे,प्रा.राजकुमार तेलंग आदींनी त्यांच्या विशेष अभिनंदन केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या