टेक्निकल टेक्सटाईल हब व वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा मार्ग सुकर:आमदार राणाजगजीतसिंह पाटील

ऐतिहासिक असा अर्थसंकल्प,कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा

कृषी क्षेत्राला १६ कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून भरीव अशी तरतूद करून विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.शेतीसाठीचा पतपुरवठा पाच वर्षात दुप्पट म्हणजे ७ लाख कोटीवरून १५ लाख कोटी रुपयांपर्यंत केला आहे. हा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारा आहे.
PPP योजनेतून देशातील उस्मानाबाद सह ११२ आकांक्षित जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा अनेक वर्षापासूनच प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. 
टेक्निकल टेक्सटाईल क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या असलेल्या प्रचंड संधी लक्षात घेत आपण कौडगाव येथे टेक्निकल टेक्सटाईल हब उभारणीबाबत  मागणी करत आहोत. आज अर्थसंकल्पात टेक्निकल टेक्सटाईल मिशन ची घोषणा करण्यात आली आहे.यासोबतच ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासासाठी या अर्थसंकल्पात योजना जाहीर करण्यात आली आहे.यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
अर्थसंकल्पात वैद्यकीय महाविद्यालय व टेक्निकल टेक्सटाईल व ऐतिहासिक स्थळांच्या पर्यटन विकासाबाबत  घेतलेल्या निर्णयामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. एकंदरीत हा अर्थसंकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांच्या आकांक्षा पूर्तीची वाटचाल गतिमान करणारा आहे.आपल्यासाठी मेडिकल कॉलेज ,टेक्निकल टेक्सटाईल हब आणि ऐतिहासीक पर्यटन स्थळ विकास योजना रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण बाबी अर्थसंकल्पामध्ये असल्याने उस्मानाबादच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या