उस्मानाबाद जिल्हापरिषदेत बंडखोर आघाडी.जिल्हापरिषदेवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व ​कायम 


रिपोर्टर: उस्मानाबाद जिल्हापरिषदेमध्ये सेना,भाजप आघाडीने सत्ता स्थापन केली असुन अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या बंडखोर सदस्या आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील सम​र्थक अस्मीता कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यांनी बंडखोरी करत बहुमत सिध्द करूण जिल्हापरिषदेची सत्ता हाती घेतली.मात्र पक्षाचा व्हिप जुगारूण बंडखोरी केलेल्या राष्ट्रवादीच्या सदस्यावर पक्ष काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या गटाने  जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली असुन तानाजी सावंत यांच्या बंडखोरीमुळे उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भाजपाला सत्ता स्थापन करता आली. तानाजी सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपाच्या गोटात दाखल झाल्यामुळे भाजपाचे संख्याबळ ३२ झाले त्यामुळे   उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अस्मिता कांबळे आणि उपाध्यक्षपदासाठी धनंजय सावंत यांची निवड करण्यात आली. तानाजी सावंत यांनी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना महाआघाडीकडून उपाध्यक्ष पद मिळावे यासाठी प्रयत्न केले होते.मात्र महाआघाडीतून पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याचे समजताच तानाजी सावंत यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत आधाची नाराज आहेत. त्यातच पुतण्याला उपाध्यक्षपद मिळावे अशी ईच्छा सावंत यांची होती.मात्र तशी परिस्थिती दिसत नसल्याने शिवसेनेचा सावंत गट भाजपाला मिळाल्याने उस्मानाबाद जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष पद धनंजय सावंत यांना मिळाले.

 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीची घोषणा झाली असली तरी उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र संभ्रमाचे वातावरण होते. राष्ट्रवादी सोडून भाजपवासी झालेल्या आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या गटामुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे बदलली आहेत.उस्मानाबाद जिल्हा परिषदेत एकूण 55 जागा असून अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी 28 हा बहुमताचा आकडा आहे. राष्ट्रवादी 26, शिवसेना 11, काँग्रेस 13, भारतीय जनता पक्ष 04 आणि अपक्ष 01 असे पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य कैलास पाटील हे आमदार झाल्याने एक जागा रिक्त झाली असून सेनेचे संख्याबळ 10 झाले आहे. आज झालेल्या निवडणुकीत आ.राणाजगजितसिंह पाटील गट १७, आ.तानाजी सावंत व आ. चौगुले गट ७, भाजपा ४, अपक्ष १, आणि कॉंग्रेस १ या प्रमाणे ३० मते मिळुन अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर कब्जा केला. तर शिवसेनेच्या छाया कांबळे या गैर हजर राहिल्या त्यामुळे अध्यक्षपदाच्या शिवसेनेच्या उमेदवार अंजली शेरखाने यांना शिवसेनेचे २, कॉंग्रेस चे १२ व राष्ट्रवादी ९ या प्रमाणे २३ मतावर समाधान मानावे लागले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या