शकंरराव बोरकर यांना माझा”शंभु पुरष्कार”

रिपोर्टर: शिवसेना नेते शकंरराव बोरकर यांना दि.16/1/2020 रोजी वडु तुळापुर (पुणे) येथे  स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा श्री शंभुराज्यभिषेक सोहळ्या निमित्त मा.खासदार छत्रपती संभाजी महाराज याच्या हस्ते  माझा”शंभु पुरष्कार”देऊन सन्मान करण्यात आले.
याबाबत असे कि शिवसेना उपनेते शकंरराव बोरकर हे प्रसिद्ध उद्योगपती असुन ते समाजातील वंचित शोषित पिडीत कष्टकरी शेतकरी कामगार यांच्यात मिळुन मिसळून त्यांच्या भावना समजून घेऊन यांना वैयक्तिक अडीअडचणी सोडवता त राज्य पातळीवरील असो जिल्हा असो गावपातळीवर असो असे काम ते करत असतात. आपल्याला येणाऱ्या पुंजी मधुन लोकांना दुष्काळाच्या वेळेत अन्नधान्य तसेच कपड्याचे वाटप सदैव करत असतात भुम परंडा वाशी मतदारसंघा मधुन निवडुन येऊन या भागातील सुशिक्षित बेकार या तरूणांना उद्योग काढुन त्यांच्या हाताला काम मिळवून देण्याचे स्वप्नं आहे.या भागातील स्वच्छ निर्मळ असा सुर्यप्रकाश लक्षात घेऊन या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प राबवुन येथील लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊन विजेच्या बाबतीत स्वंयपुर्ण मतदार संघ करावा.सतत दुष्काळी पठ्यात भाग असलेल्या ने या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवुन द्यावं.दुग्धव्यवसाया साठी या भागात पुष्क वातवरण आहे.यासाठी चलना देणे याचाच भाग म्हणून या भागात पहिला शिवसेनेचा साखर कारखना म्हणून नरसिंह साखर कारखान्याची उभारणी आपल्या संगड्यानं घेऊन केली.या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उचावे व त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा या उदात्त हेतुने हे काम केले.असे अनेक काम व कल्पना त्यांच्या डोळ्या मध्ये सतत घोळत असतात.या भागातील दळवळन रस्ते सुधारावे यासाठी सतत प्रयत्न करत असतात. अशा निष्ठावान व्यक्ती शंकरराव बोरकर यांना माझा शंभु पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.त्याच्यांवर भुम पंरडा वाशी मतदारसंघातुन अभिनंदनाचा वर्षीव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या