
रिपोर्टर: महाविकास आघाडीच्या सरकार मधील पालकमंञ्यांची यादी जाहीर झाली असुन नगर जिल्हयातील नेवासा मतदार संघातील आमदार आणि ठाकरे सरकार मध्ये मृद व जलसंधारण मंत्री असलेले शंकरराव गडाख यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासुन संतगतीने चाललेली खातेवाटप आणि मंत्रीमडळाच्या विस्ताराची प्रक्रीया आता पुर्णत्वाकडे आल्याचे दिसत आहे.दि.8 जानेवरी रोजी महाराष्ट्रातील पालकमंञ्यांची यादी महाविकास आघाडीने जाहीर केली. त्यामध्ये उस्मानाबाद जिल्हयासाठी पालकमंत्री म्हणुन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0 टिप्पण्या