देशाच्या हितासाठी माहीती अधिकाराचा वापर व्हावा : आयुक्त धारूरकररिपोर्टर: माहीती अधिकाराचा योग्य वापर केला तर देशाच्या हीतासाठी त्याचा उपयोग होवू शकतो.त्याच बरोबर माहीती अधिकारानी सर्वत्र पारदर्शकताही येवू शकते.त्यामुळे गैरवापर न करता देशाच्या हितासाठी माहीती अधिकाराचा वापर व्हावा असे मत औरंगाबाद खंड पिठाचे राज्य माहीती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी उस्मानाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

राज्य माहीती आयुक्त धारूरकर दि.28 आणि 29 जानेवरी रोजी अपिलांचा सुनावनी कार्यक्रम घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा दौ—यावर आले होते.या सुनावनी कार्यक्रमा दरम्यान 300 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असुन लवकरच या निकालाचा अवहाल प्रतेक अपिलार्थीला देण्यात येणार असल्याचे आयुक्त धारूरकर यांनी सांगीतले.या सुनावनी वेळी अपिलार्थी व जनमाहीती अधिकारी तसेच प्रथम अपिलीय अधिकारी यांनी व्यक्तीश:उपस्थित राहुन आपली बाजू मांडली.त्या नुसार राज्य माहीती आयुक्तांनी लेखी व तोंडी युक्तीवाद विचारात घेवून सर्व व्दितीय अपिलावर आदेश पारीत केलेले आहेत.राज्य माहीती आयुक्त धारूरकर यांनी माहीती अधिकारांचा गैरवापर,माहीती अधिकारातुन माहीती घेण्याचे नियम,आणि कुठल्या प्रकारची माहीती देता येत नाही.या संबंधीची माहीती यावेळी सांगीतली. 
त्याच बरोबर दि.29 जानेवरी रोजी आयुक्तांनी उस्मानाबाद जिल्हयातील सर्व सार्वजनिक प्राधीकरणातील कार्यालय प्रमुखांची कार्यशाळा ही घेतली.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या