राजकीय साहित्य संमेलनासाठी मी समर्थ : मकरंदराजे निबांळकररिपोर्टर: पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी 25 ते 30 लाख रूपये उस्मानाबाद नगरपालिकेने खर्च केले.तिच नगरपालिका राजकीय साहित्य संमेलनासाठी सुध्दा सम​र्थ आहे.असे मत दि.18 जानेवरी रोजी पार पडलेल्या राजकीय साहित्य संमेलनाच्या बैठकी दरम्यान नगराध्यक्ष मकरंद राजे निबांळकर यांनी व्यक्त केले.त्याच बरोबर आम्ही कुठल्याही शासकिय अधिकारी किंवा शिक्षकाच्या पगारी न घेता हे राजकीय साहित्य संमेलन पार पाडू शकतो असेही मकरंदराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.


उस्मानाबाद येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये साहित्यिक विरूध्द राजकीय प्रतिनिधी असा काहीसा वाद रंगल्यामुळे राजकीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्या संदर्भात दि.18 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथील शिंगोली विश्राम गृहावर राजकिय प्रतिनिधिच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार कैलास पाटील,जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा अस्मीता कंबळे,उपनगराध्यक्ष आबा इंगळे,बांधकाम सभापती युवराज नळे शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव,यांच्यासह शहरातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना निबांळकर म्हणाले की उस्मानाबाद शहरासह जिल्हयातील बरेच लोक मला भेटत आहेत.आणि नाराजी व्यक्त करत आहेत.राजकीय लोकांना कमी लेखण्याचे काम संमेलनात झाले असल्यामुळे राजकीय साहित्य संमेलन घेण्याची सर्वांचीच इच्छा आहे.परंतु राजकीय साहित्य संमेलन जरी घेण्यात आले तरी कुठल्या​ही व्दशापोटी किंवा कुनालाही प्रतिक्रीया दिण्यासाठी आम्ही घेणार नाहीत.आणि जिल्हयातील सर्वस्तरातील लोकांचा विचार घेवून संमेलनाचे आयोजन होईल.या संमेलनामध्ये जिल्हयातील गरजेचे आणि महत्वाचे विषय प्रार्कशाने मांडले जातील.या संमेलनासाठी प्रतेक क्षेत्रातील लोकांना निमंत्रीत केले जाईल.सर्वात महत्वाचे म्हणजे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व जेष्ठ वरिष्ठ राजकीय नेत्यांचा विचार घेवून या संमेलनाचे अयोजन केले जाईल. आमदार,खासदार,मालकमंत्री यांच्याशी या विषयी संवाद साधल्या नंतर आम्ही समाजातील सर्व घटकांना सुचना देवून या संमेलनाचे आयोजन करणार असल्याची माहीती या बैठकी दरम्यान नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर यांनी दिली.

 संमेलानाच्या आयोजनासाठी राजकीय प्रतिनिधीसह शहरातील मान्यवरांचा  पाठींबा 

राजकीय साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राजकीय प्रतिनिधीसह शहरातील मान्यवरांचा उत्फुत पाठींबा मिळत असुन दि.18 जानेवारी रोजी आयोजीत केलेल्या बैठकीला शहरासह जिल्हयातील राजकीय प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील लोकांची उपस्थिती होती.त्याच बरोबर विविध पक्ष आणि शहरातील नागरिकांनी हे राजकीय साहीत्य संमेलन व्हावे यासाठी उस्फुत प्रतिसाद दर्शिवला आसुन संगळया राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी कडुन ही होकार मिळत आहे.या बैठकीला मोठया संख्येने शहरातील मान्यवरांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या