
उस्मानाबादमध्ये राजकिय साहीत्य संमेलन घेण्याची तयारी सुरू
रिपोर्टर: उस्मानाबाद येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहीत्य संमेलनामध्ये राजकीय प्रतिनिधीना स्थान आणि मान न दिल्याने नाराजी व्यक्त होत असल्याने वेगळेच राजकीय साहीत्य संमेलन आयोजित करण्याची संकल्पना उस्मानाबादमध्ये आखण्यात येणार आसल्याची माहीती समोर येत आहे. झालेल्या अखिल भारतीय सहीत्यसंमेलनात राजकीय प्रतिनिधीचा अपमानच झाला आसल्याची कबुली उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर यांनी दिली आहे.
उस्मानाबादमध्ये नुकतेच पार पडलेले साहीत्य संमेलन हे मान अपमानाच्या नाटयाने प्रकाश झोतात आले.आणि त्यातुनच काही राजकीय प्रतिनिधीना ही राजकीय साहीत्यसंमेलन आयोजित करण्याचे वेद लागल्याचे दिसत आहे.त्याचे कारण म्हणजे उस्मानाबाद येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय साहीत्य संमेलनामध्ये राजकीय प्रतिनिधी आणि आजी माजी मंत्री यांच्या कडुन अर्थिक सहाकार्य लाभले होते.परंतु त्यांना योग्य तो मान मीळाला नाही यासाठी सवत्र नाराजीचा सुर एैकायला मीळत आहे.उस्मानाबाद नगरपालिकेने पार पडलेल्या साहीत्य संमेलनाला भरभरूण सहकार्य केले परंतु या बदल्यात नगराध्यक्षांना साधी निमंत्रन पत्रीका सुध्दा आयोजका कडुन देण्यात आली नसल्यामुळे शहरातील नागरीक आणि राजकिय प्रतिनिधीकडुन नाराजी व्यक्त केली जात आहे.त्या कारणामुळेच उस्मानाबादमध्ये आखिल भारतीय राजकीय साहीत्य संमेलन होवू शकते आशी माहीती नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर यांनी दिली.
जिल्हयातील महत्वाचे प्रश्न संमेलनातुन मंडने गरजेचे होते.
आफाट खर्च करूण पार पाडलेल्या साहीत्य संमेलानामध्ये प्रार्कशाने जिल्हयातील मागासलेपना आणि बेकारी या मुदयावर मांडनी होणे गरजेचे होते.परंतु तसे काही झाले नसल्याचेही नगरध्यक्ष निबांळकर यांनी सांगीतले.त्याच बरोबर संमेलनाने जिल्हयाला काय दिले हा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला.शेतक—यांच्या आत्महत्या जिल्हयाचा मागासलेपणा असे प्रश्न बाजुला ठेवून इतर गोष्टीला महत्व देण्यात आले.त्यामुळे हे संगळे प्रश्न राजकीय साहीत्य संमेलनातुन मांडण्यात येतिल आणि जिल्हयाच्या आडचनी सर्वत्र पोहचण्यास मदत होईल असेही निबांळकर म्हणाले.
माझे राजकीय नेत्याशी बोलनं चालु आहे.
साहीत्य संमेलन पार पडल्या नंतर आनेक लोक मला येवून भेटले आणि नाराजी व्यक्त केली.त्यामुळे राजकीय साहीत्य संमेलनाची संकल्पना समोर आली असुन याबाबत मी जिल्हयातील वरिष्ठ राजकीय नेत्यांना संवाद साधत आहे. संगळयाकडुन सहकार्याची भावना व्यक्त होत आहे. लवकरच यावर एक बैठक घेण्यात येईल आणि सर्वानुमते निर्णय घेण्यात येणार असल्याची माहीती नगराध्यक्ष मकरंदराजे निबांळकर यांनी दिली.
0 टिप्पण्या