तुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी विमलबाई मुळे तर उपसभापतीपदी चित्तरंजन सरडे यांची निवड


तुळजापूर पंचायत समितीवर आमदार राणा पाटील यांच्या गटाचे वर्चस्व 

तुळजापूर रिपोर्टर:- तुळजापूर पंचायत समिती सभापतीपदी शहापूर गणातील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती विमलबाई आप्पाराव मुळे  यांची तर उपसभापतीपदी मंगरूळ गणातील राष्ट्रवादीचे आमदार राणाजगजितसिंह पाटील समर्थक चित्तरंजन भालचंद्र सरडे यांची निवड झाली.

भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडी पार पडल्या, तुळजापूर पंचायत समिती एकूण 18 सदस्य असून दहा सदस्य काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत तर आठ सदस्य राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिला मिळाले.
टावर निवडून आलेले आहेत,परंतु आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना मानणा—या गटाचे वर्चस्व पहाय
दि.31 रोजी दुपारी 2 वाजता या निवडीचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात सम्पन्न झाला,यावेळी 17 सदस्यांची उपस्थिती होती,9 विरुद्ध 8 असे मतदान झाले, यातील श्रीमती रेखा जनार्दन कोरे या अपात्र असल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावता आला नाही,तर विधानपरिषद निवडणूक 2019 प्रचार काळात काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या शहापूर गणातील श्रीमती विमल आप्पाराव मुळे ( सराटी ) यांनी भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांचा प्रचार केल्याने व पाटील गटात सामील झाल्याने त्यांना सभापतीपदाची लॉटरी लागली.
सभापतीपदी श्रीमती विमलबाई मुळे व उपसभापती चितरंजन सरडे यांच्या निवडीनंतर भाजप युवा नेते मल्हार राणा पाटील,भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड.अनिल काळे,नगराध्यक्ष बापूसाहेब कणे,विनोद गंगणे, दीपक आलुरे,संतोष बोबडे, विक्रम देशमुख, वसंत वडगावे, शिवाजी बोधले, विजय शिंगाडे, सत्यवान सुरवसे, नारायण नंनवरे, आदेश कोळी, सुहास साळुंखे,आनंद कंदले यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या