आमदार दरेकर यांच्या हास्ते धाराशिव कारखाण्याच्या साखर पोत्याचे पुजन


 रिपोर्टर: धाराशिव साखर कारखाण्याच्या 2019 मधील गळीत हंगामातील पहील्या पाच साखर पोत्याचे पुजन 9 डिेसेंबर राजी भाजपाचे आमदार व मुंबई जिल्हा मध्यवर्ती सह.बॅंकेचे चेअरमन प्रविण दरेकर यांच्या हास्ते पार पडले.यावेळी धाराशिव साखर कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील,आमदार कैलास पाटील,उस्मानाबाद जनता बॅंकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदानी,मनसेचे प्रदेशाध्यक्ष दिलीपबापू धौत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चोराखळी येथिल धाराशिव साखर कारखाण्याच्या 2019 च्या गळीत हंगामास सुरवात झाली असुन आगदी दुष्काळात सुध्दा न थंबता  शेतक—यांना योग्य मार्गदर्शन करूण कारखाना योग्य रितीने चालवला जात असल्याने ​परिसरातील शेतक—यांच्या उसाचा प्रश्न सुटला आहे.
2019 च्या गळीत हंगामाला ही थाटात सुरूवात झाली असुन दि.9 डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांच्या हास्ते साखर पोत्याचे पुजन पार पडले.यावेळी कार्यकारी संचालक अमरसाहेब पाटील,संचालक दिपक आदमिले,संजय खरात, रामभाऊ राखूंडे,आबासाहेब खारे,सुहास शिंदे व कार्तिक पाटील,राजेंद्र गटाप,प्रशांत गिड्डे, आकाश चिगरे,तसेच कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या