भुम परिसरात आवकाळी पाऊसाचा फटका.
रिपोर्टर: वातावरणात पुर्णता बदल झाल्याने दि.26 डिसेंबरच्या मध्यरात्री जिल्हयातील भुम तालुक्यामध्ये काही परिसरात शेतक—यांच्या ज्वारी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान आव​काळी पावसाने नुकसान केले आहे.परिसरात उभी असलेली पिके आढवी झाल्याने शेतक—यांचे पुन्हा एकदा नुकसान झालेले पहायला मिळत आहे.
26 रोजी रात्री बाराच्या दरम्यान वादळी वा—यांसह हलक्या पावसाच्या सारी कोसळुन तालुक्यातील वंजारवाडी परिसरातील ज्वारी ची पिके जमीनदोस्त झाले आहेत.यात गजेंद्र डोबांळे,बाजीराव डोबांळे, सर्जेराव डोबांळे, शिवाजी डोबांळे,यांची कंबरे बरोबर आलेली ज्वारी जमीनदोस्त होऊन लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.जोपसलेली ज्वारी जमीनदोस्त झाल्याने याचा पिक पंचनामा करून तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतक—यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या