माळेगांव यात्रेत गुरुद्वारा बोर्डाच्या दोन अश्वांना प्रथम पारितोषीक : उस्मानाबाद जिल्हयातील बापूराव पाटील यांचा घोडा ही चमकला यात्रेतनांदेड रिपोर्टर:  श्री क्षेत्र खंडोबा माळेगांव यात्रेत आयोजित वेगवेगळ्या दोन स्पर्धेत गुरुद्वारा बोर्डाचे दोन अश्वांना (घोड्यांना) प्रथम पारितोषिक मिळाले आहे. वरील स्पर्धेत पहिल्यांदाच पारितोषिक मिळाल्याबद्दल गुरुद्वारा बोर्ड पदाधिकारी, सदस्य, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठा आनंद व्यक्त केला जात आहे. जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी गुरुद्वारा तखत सचखंड समोर दोन्ही अश्वांचे लाड करून त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच असतबल कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदरसिंघ बुंगाई, सदस्य मनप्रीत सिंघ कुंजीवाले, व्यवस्थापन समितीचे देवेंद्र सिंघ मोटरावाले, माजी सदस्य राजेंद्रसिंघ पुजारी, स. डी.पी. सिंघ चावला, अवतार सिंघ पाहरेदार, कनिष्ठ अधीक्षक ठानसिंग बुंगाई, हरजीतसिंघ कडेवाले आदींची उपस्थिती होती. वरील दृश्य एकूणच भावपूर्ण असा होता.वरील विषयी माहिती अशी की श्री क्षेत्र मालेगाव यात्रेचे ता. २७ डिसेंबर ते २८ डिसेंबर दरम्यान लोहा तालुक्यात आयोजन करण्यात आले होते. वरील यात्रेत मोठ्या प्रमाणावर अश्व व पशु देखील दाखल झाले होते. या यात्रेत पशूंसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत जिल्हा परिषद आणि माळेगाव यात्रा तालुका लोहा यांच्या तर्फे दि. २५ डिसेंबर रोजी पशु प्रदर्शनाने आयोजन होते. त्यात दोन दांत अश्व स्पर्धेत गुरुद्वारा बोर्डातर्फे पाचारण करण्यात आलेल्या अस्ताबळ मधील अश्व फौजासिंघ (स्पर्धक अश्व क्रमांक ३४) यास प्रथम पारितोषिक मिळाले. या घोड्यास रोख १५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह तसेच प्रमाणपत्र देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळकर आणि जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन सभापती श्री रेड्डी दत्तात्रय रेड्डी यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. या सोबतच स्व. दगडोजीराव देशमुख स्मरणार्थ इक्वेस्ट्रेयन स्पोर्ट्स अससोसिएशन ऑफ इंडिया लातूर यांच्या तर्फे आयोजित मारवाड नर स्पर्धेत गुरुद्वारा बोर्ड असतबल मधील घोडा माधव (स्पर्धक क्रमांक ९२) याने प्रथम पारितोषिक प्राप्त केले. या आश्वास २१ हजाराचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी स्पर्धेचे आयोजक धीरज देशमुख, जितेंद्रसिंघ पहाडिया आदींच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. या स्पर्धेसाठी गुरुद्वारा बोर्डाच्या असतबल विभागातून यात्रेत सहभागी होण्यासाठी कनिष्ठ अधीक्षक रविंदरसिंघ कपूर, बसंतसिंघ रागी, जितेंदर सिंघ जवान, असतबल प्रमुख गुरुदयालसिंघ सपुरे, सत्पालसिंघ कारागीर, सरबजीतसिंघ, गुरमितसिंघ, राजेशसिंघ, माधव जलबा, रंगबीरसिंघ, कमलजीतसिंघ यांचा समावेश होता. गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य यांनी असतबल येथील कर्मचाऱयांना शुभेच्छा दिल्या आहे. तसेच गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक स. गुरविन्दर सिंघ वाधवा यांनी श्री क्षेत्र मालेगाव येथील यात्रेत गुरुद्वाराच्या अश्वांचा समावेश आणि स्पर्धेत प्रथम येण्याची घटना गुरुद्वारा बोर्डाच्या इतिहासातील पहिल्यांदाच घडल्याचे सांगितले. स्थानिक शीख समाज आणि युवा वर्गाची अशी मागणी होती की गुरुद्वाराच्या घोड्यांनी मालेगाव यात्रेत सहभागी व्हावे. शिख समाजात सुद्धा या विषयी उत्सुकतेचे वातावरण आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील बापूराव पाटील यांचा घोडा ही चमकला माळेगाव यात्रेत 

आजच्या काळात घोडयाचा शोक करणे आणि त्याचे पालन पोशन करणे ही फार आवघड काम आहे.परंतू या संगळया गोष्टीवर मात करत परंपरेने घोडयाचे पालन करणारे उस्मानाबाद जिल्हयातील मुरूमचे बापूराव पाटील यांचा घोडा माळेगावच्या यात्रेत आकर्षण ठरला.

उस्मानाबाद जिल्हयातील कॉग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी आमदार बसवराज पाटील यांच्या घरामध्ये घोडा पाळण्याची परंपरा फार पुर्वीपासुन आहे.आगदी आजही घरातील युवा प्रतिनिधी आणि उस्मानाबाद जिल्हापरिषदेचे विरोधीपक्ष नेते शरण पाटील सुध्दा त्या परंपरेचे पालन करताना दिसतात.घोडयाची देखभाल आणि त्याची जोपासना योग्य रितीने केल्यामुळे पाटील यांच्याकडील अश्व सर्वाचे लक्ष वेधुन घेते.आगदी त्या प्रमाणेच महाराष्ट्रात घोडयासाठी प्रसिध्द असलेल्या माळेगावच्या यात्रेत पाटील यांचा घोडा सर्वांचे आकर्षण ठरला.     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या