येडशी जवळील वडगाव पाटीवर ट्रक बैलगाडीचा भिषण आपघात चार जनांचा मृत्यू:रिपोर्टर: राष्ट्रीय महामार्ग 52 वरील येडशी गावापासुन जवळच असलेल्या वडगाव पाटीवर ट्रक आणि बैलगाडीच्या भिषण आपघातामध्ये तिघांचा जागीच तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.असुन एकावर दवाखाण्यात उपचार सुरू आहेत.सदरील घटना ही दि.25 डिसेंबर रोजी घडली असुन आपघामध्ये मयत झालेले सर्वंजन वडगाव येथिल रहिवाशी आहेत. 

उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव जाहागीर गावातील शेतकरी वेळ आमवस्याचा कार्यक्रम आटपून संध्याकाळी साडेसहा वाजता गावाकडे येत असताना भरधाव आलेल्या कंटेनर ने रस्त्याच्या कडेला चलत असलेल्या बैलगाडीला जोराची धडक दिली.धकड येवडी जोराची होती की सदरील वैलगाडीतल तिन जन जागीच मरण पावले.तर एकजनाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.आपघाता मरण पावलेल्यामध्ये उमा उर्फ रेश्मा सुरेश पवार वय वर्ष 25 ,गुंजन सुरेश पवार वय वर्ष 12 छाया मतू पवार वय वर्ष 60 या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर मटुजि नवनाथ शेटे वय वर्ष 40 हे व त्यांचा मुलगा युवराज शेटे वय वर्ष 6  हे हे गंभीर जखमी झाले.मात्र उपचारा दरम्यान 6 वर्षाच्या युवराजचा मृत्यू झाला.सदरील आपघात येवडा भिषण होता की अक्षरश: बैलगाडीचे तुकडे,तुकडे झाले.तर एक बैल जागीच मृत्यू पावला.आपघात ग्रस्त कंटेनर पळून जात असताना काही अंतरावर पकडण्यात आला.राष्ट्रीय महामार्ग पोलीस केंद्र उस्मानाबाद व येरमाळा पोलीसांनी घटना स्थळाचा पंचनामा करूण पुढील कार्यवाही केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या