आयआरबी च्या विरोधात येडशी,तामलवाडी टोलनाक्यावर आंदोलनउस्मानाबाद  रिपोर्टर     जिल्हयातील वहानधारकांना टोलची सेवा मोफत मीळावी आणि लोकलच्या वहानांकडून टोल वसूली थांबवावी तसेच स्थानिक शेतकरी, वाहनधारकांना व विद्यार्थी वाहनधारकांना संपुर्ण टोल माफी करावी, फास्टटॅग प्रणाली ऐवजी रोख रक्कम घेऊन ये-जा करण्याची लाईनी वाढविण्यात यावी जिल्हातंर्गत ९० रू.च्या ऐवजी प्रती वाहन ३० रू.टोल पुर्वप्रमाणे चालू ठेवावे आदी मागण्यासाठी राजकीय प्रतिनिधि आणि ग्रामस्थाच्या वतीने जिल्हयातील येडशी आणि तामलवाडी टोलनाक्यार दिवसर गाडया विनाटोल सेाडून आंदोलन करण्यात आले.   

उस्मानाबाद जिल्हयातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग 52 या महामार्गावर सोलापूर पासुन बिडपर्यंत तिन टोलनाके हे उस्मानाबाद जिल्हयामध्ये येतात.टोलनाक्याजवळील गावातील वहानधारक तसेच व्यावसाईक यांना आपल्या कामा निमीत्त ये जा करावी लागते.मात्र प्रतेकवेळी टोल भरणे शक्य नसल्याने या लोकांना आडचनीचा सामना करावा लागत आहे.यामुळे टोलनाका असलेल्या जवळपासच्या ग्रामस्थामध्ये आयआरबी कंपनी विषयी असंतोष निर्माण झाला होता. नेमका हाच मुददा पुढे करत राजकीय प्रतिनिधींनी दि. 26 डिसेंबर रोजी येडशी आणि तामलवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले. पुणे, हडपसर या भागातील नागरिकांना ३० किलोमीटर आत टोल माफी आहे, त्याच पध्दतीने आयआरबीच्या टोल नाक्यावर जिल्हयातील वाहनधारकांना टोल माफी करावी,प्रत्येक टोल नाक्यावर प्रथम फास्टटॅग काढताना बाहीरील दलाली बंद करावी, टोल नाक्यावर आलेले वाहन ३ मिनिटाच्या आत पुढे सोडावे, वाहनास पुढे जाण्यास वेळ लागल्यास वाहन विनामुल्य सोडावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. आंदोलनकत्र्यांच्या वतीने आयआरबीचे प्रकल्प संचालक सोलापूर यांना निवेदन देण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या