मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार:निर्लज्जपणाचा कळस


व्यवसाईक संस्थापक आणि फक्त पगार घेणारे शिक्षक जिम्मेदार  

अत्यचार करणा—याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी रिपोर्टर:तुळजापूर तालुक्यातील हंगरगा तुळ येथील रावसाहेब जगताप कर्णबधिर विद्यालयातील 14 वर्षाच्या विद्यार्थीनीवर एका कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.ही घटना महीनाभर दाबून का ठेवण्यात आली.संस्थापक आणि समाजकल्यान विभाग झोपला हाता काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.
पीडित विद्यार्थीनी मूकबधिर असून तिला बोलता येत नाही, तिने एका पथकाला लिखित दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु पालकांच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शाहीर अष्टोळ असे हे कृत्य केलेल्या नराधमाचे नाव असून  त्याच्यावर तुळजापूर पोलीसात  आयपीसी 376 (2) (F) (J) (I) (L)(N) तसेच सहकलम 4,6  पास्को 2012 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हयामध्ये समाजकल्यान विभागाच्या माध्यमातुन चालणार्या जवळ जवळ 29 च्या आसपास दिव्यांग शाळा आहेत यामध्ये अस्तीव्यंग,मुखबधिर,अंध या तिन्ही प्रवर्गाच्या निवासी शाळा जिल्हयामध्ये चालवल्या जातात.मात्र समाजकल्यान विभागाचे दर्लक्ष असल्याने या शाळेमध्ये सुविंधाचा अभाव असुन दिव्यांग विदयार्थ्याची चेस्टा करण्याचे काम केले जाते.निवासी शाळेमध्ये मॅचवर मुली असताना काही शाळमध्ये संध्याकाळी या मुलींची देखभाल करण्याकरीता महीला कर्मचारी सुध्दा नाहीत.त्यामुळे उघडकीस आलेला हा एक प्रकार आसला तरी आनेक अशी प्रकरणे दडपण्याचे काम संस्थेच्या माध्यमातुन होत आहेत.व्यवसाईक संस्थापक आणि पगार घेणारे शिक्षक असल्याने या दिव्यांगावर वारंवार अन्याय होताना दिसतात.आशा प्रकारच्या दिव्यांग मुलीवर अत्यचार करणा—या नराधमाला फाशी देण्याची मागणी समाजातुन होत आहे.

11 ऑक्टोबर 2019 रोजी रावसाहेब जगताप या निवासी कर्णबधिर शाळेत पीडितेसह आणखी 6 मुली निवासाला होत्या. संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान पीडित मुलीला पाऊस पडत असल्याने थंडी वाजत होती, म्हणून ती स्वयंपाक घरात चुलीसमोर शेकायला गेली होती, तिथे विद्यार्थी – विद्यार्थ्यांना जेवण वाढणारा शाहीर अष्टोळ हा होता. त्यावेळी स्वयंपाक करणाऱ्या मावशी आल्या नसल्याने आणि स्वयंपाक घरात कोणी नसल्याने त्याचा फायदा घेत पीडित विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार केले.इतक्या दिवस हा प्रकार समोर आला नव्हता, मात्र 23 नोव्हेंबर 2019 रोजी बाल सप्ताह असल्याने शहरातील दामिनी पथक पाहणीसाठी शाळेत गेले होते. त्यावेळी या विद्यार्थ्यांनी लिहून पीडितेसोबत शाहीर अष्टोळ याने लैंगिक अत्याचार केल्याचे सांगितले. त्यावेळी हा सर्व प्रकार समोर आला आहे.आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांत फिर्याद दाखल होऊन 9 दिवस झाले तरी कसल्याही माहीती बाहेर आली नाही याच कारण काय? हे अद्याप समजू शकले नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या