तहसिलदार यांच्या वरील हल्ल्याच्या निषेधार्थ महसुल कर्मचाऱ्यांचे काम बंद अंदोलन


  रिपोर्टर: परंड्याचे तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या वर वाळू माफी यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महसुल कर्मचा -यांनी काळया फिती लाऊन एक दिवसीय  काम बंद आंदोलन करून सर्व फरार आरोपींना २ दिवसात अटक करावी अन्यथा बेमुदत लेखनी बंद  अदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

नायब तहसिलदार ईनामदार यांना  मागण्याचे निवेदन देण्यात आले या अंदोलनात  पेशकार, मंडळ अधिकारी , तलाठी , लिपीक , शिपाई  कोतवाल सर्व  कर्मचारी सहभागी झाले होते .

  तहसिलदार अनिल कुमार हेळकर हे वाळू उत्खनन विरोधी पथका सह  अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू माफीयावर कारवाई करण्या साठी दि १४ डीसेंबर रोजी  गेले असता भोत्रा रोडवरील खडी केंद्रावर वाळू माफीयांनी तहसिलदार हेळकर यांच्या अंगावर टॅक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता या हल्ल्यात  तहसिलदार गंभीर जखमी झाले आहे .
या घटनेचा निषेध करीत परंडा महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद अंदोलन करून फरार असलेल्या आरोपींना अटक करून शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे .

निवेदनावर ए.पी बनसोडे , पी .जी  हटकर , एन बी करळे, व्ही के बनसोडे , जे एस खुने ,सी बी कसाब , व्ही .सी खळदकर , एम. बी स्वामी , एम .एम जिनेरी , आटूळे , श्रीमती एम .बी मसगुडे , जी .जी ढोणे, एन एम नन्नावार, एन .एस मोरे ,पी.व्ही वेदपाठक ,  ए व्ही बाभळे , एच व्ही मुळे , पी .जी ऐतवाडे, सुधीर देडगे , एम , ए वाघमारे , एस .टी साळुंके , श्रीमती गायकवाड यांच्या सह  आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या