परंडा तालूक्यात वाळु माफीयांचा धुमाकुळ , तहसिलदार यांना चिरडून मारण्याचा प्रयत्न

 बाराजनावर गौन खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल 

 सुरेश बागडे रिपोर्टर  परंडा तालूक्यात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असुन वाळू माफीयावर कारवाई करण्यासाठी पथका सह गेलेले परंड्याचे तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अंगावर वाळू ने भरलेला टॅक्टर घातला.
सदरील दि.१४ डीसेंबर रोजी सकाळी ५ ते ६च्या दरम्यान परंडा शहरा जवळ असलेल्या भोत्रा रोडवर घडली यामध्ये तहसिलदार हेळकर गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर बार्शी येथिल हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.या प्रकरणी परंडा पोलिसात बारा जना विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उस्मानाबाद जिल्हयातील परंडा तालुक्यामध्ये अवेैध रित्या वाळु उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आल्याने तहसिलदार यांच्यासह महसुल कर्मचारी परंडा शहरापासुन जवळच असलेल्या भोत्रा रोडवर कारवाई करण्यासाठी गेले असता वाळू माफीयांनी तहसिलदार यांच्या अंगावर टॉक्टर घालुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला.परंडा तालूक्यातील सिना  नदी  भोत्रा परिसर तसेच देवगाव ( खु ) उल्का नदी तसेच तालूक्यातील विविध भागातील नदी पात्रातून  मोठया प्रमाणात वाळूचे अवैध उत्खनन करुन चोरटी वाहतुक केली जात होती.ती थांबवण्यासाठी तहसिलदार अनिल कुमार हेळकर यांच्यासह परंडा सज्जाचे तलाठी चंद्रकांत कसाब, लीपीक अकाश बाभळे , नागेश करळे, संगणक आॅपरेटर अशीष ठाकुर हे पथक घटणा स्थळी पोहचताच वाळू चोर टॅक्टर सह पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना तहसिलदार यांनी थांबण्यास सांगितले असता टॅक्टर चालकाने तहसिलदार यांच्या अंगावर टॅक्टर घातला या मध्ये ते गंभीर जखमी झाले असुन त्यांना उपचारा साठी बार्शी येथिल रूग्णालयात दाखल करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच भुमचे उपविभागीय पोलिस आधिकारी विशाल खांबे, उपविभागीय आधिकारी श्रीमती मनिषा राशीनकर,पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब राठोड यांनी घटणा स्थळी भेट देऊन पाहणी केली. घटणा स्थळा वरुन तिन टॅक्टर एक टीप्पर तिन मोटार सायकल विद्युत पंप पाईप  जप्त करण्यात आले आहे.या प्रकरणी परंडा सज्जाचे  तलाठी  चंद्रकांत कसाब यांच्या फिर्यादी वरून आरोपी मयूर वाघमारे,आण्णा खडके,संताजी खडके, संतोष गायकवाड,बच्चन गायकवाड,सतीश मेहेर,बाळू गायकवाड , धनाजी गायकवाड,प्रशांत गायकवाड,धनंजय काळे सर्व रा परंडा व अरविंद नरूटे,रा.अवारपिंपरी, इंद्रजित महाडीक रा.मुंगशी या बारा जना विरूध्द भादवी चे कलम ३०७ , ३५३ , ३७९ , ३३२, ३३३, ४२७,३४ सह कलम ४८ ( ७ )( ८ ) गौन खनिज अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पो.निरिक्षक इकबाल सय्यद हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या