उस्मानाबाद नगरपालीकेला जिजाऊ ब्रिगेडचे टाळे रिपोर्टर:
उस्मानाबाद शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील वासुदेववाडी या भागातील अस्वच्छतेच्या कारणामुळे दोन महिन्यापुर्वी एका चिमुकलीचा डेंग्यु या आजाराने मृत्यू झाला होता.या प्रभागामध्ये अस्वच्छताही नगरपालीकेची जिम्मेदारी असल्या कारणामुळे या भागातील अनेक महिलांसह शहरातील विविध भागातील जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी एकत्रित येऊन उस्मानाबाद नगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन


 शहरातील मूलभूत प्रश्नांकडे नगरपालिकेने लक्ष देवून नागरीकांचे प्रश्न सोडवावेत या मध्ये प्रामुख्याने वीज, स्वच्छ पाणी, चांगले रस्ते, आरोग्यसाठी स्वच्छता राखणे यासाठी शहरातील अनेक भागात भर पावसाळ्यात रस्त्यांची होणारी अडचण, विविध ठिकाणी घाण पाणी साचून दुर्गंधीजन्य परिस्थिती निर्माण झालेला परिसर स्वच्छ करावा तसेच त्या पाण्याचा निचरा करून गटारीचे काम त्वरित करावे, रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे वाकडे झालेले खांब, मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा, महत्त्वाच्या ठिकाणी कचराकुंड्या ठेवणे, ठराविक वेळेनुसार घंटागाड्या सर्व भागात फिरवणे, विविध उपक्रमाबाबंत जनजागृती करणे यासह इतर समस्यांबद्दल अनेकवेळा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना निवेदने देण्यात आली आहेत. परंतु नगरपालिकेच्या गचाळ कारभारामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. त्यामुळे अनेक निवेदने देऊनही नगरपालिका प्रशासन विभाग दखल घेत नसल्याने त्यांच्या अकार्यक्षमतेच्या निराशाजनक कामामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषदेच्या प्रशासन विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना शेवटचे निवेदन देवून महीलांनी आंदोलन केले. जर पंधरा दिवसात कामे नाही केली, लोकांच्या समस्या दूर केल्या नाही तर तिव्र आंदोलन करण्याचा इशारा महीलांनी पालीका प्रशासनाला दिला आहे.  जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अर्चनाताई अंबुरे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद नगरपालिकेला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. तब्बल एक तास अधिकाऱ्यांना नगरपरिषदमध्ये कोंडून ठेवल्यानंतर नगरपालिकाचे अधिकारी खडबडून जागे झाले. व पोलिस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी आंदोलनकर्त्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांना उप. मुख्याधिकारी पी. एम. पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर पवार यांनी सांगितले की अवघ्या पंधरा ते वीस दिवसांत तुम्ही मांडलेल्या समस्या आम्ही आवर्जून लक्ष देवून त्या दूर करू. यांच्या आश्वासनानंतर त्यावेळी आक्रमक असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी त्यांना एक महिन्याची मुदत देऊन एक महिन्यात ही जर कामे नाही झाली तर यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा गर्भित इशारा दिला. या आंदोलनास वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेनेही सक्रियपणे पाठिंबा दिला.यावेळी
वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव, मनीषा सातपुते, मीरा सातपुते, स्वाती सातपुते, शितल सातपुते, राधा सातपुते, देवा बुरफे, कुसुमबाई पवार, स्वाती कंटे, वर्षा कंटे, सविता राठोड, वंदना राठोड, कविता अडसूळ, विद्याबाई गडकर, ज्योती झोंबाडे, मनीषा शिंदे, राधिका चव्हाण, अर्चना सुरवसे, राणी वाघे, मनीषा कोळगे, लक्ष्मी आडसुळ, कविता सातपुते, लक्ष्मी जाधव, गीता सिंगनाथ, दिपाली राजपूत, मनीषा बायस, कीर्ती सातपुते, सुवर्णा इंगळे, पारूबाई बायस, जनाबाई चव्हाण,कविता राठोड, लता अडसूळ, गंगुबाई काळे, अरूणाबाई, शितल गवळी, अनुराधा कांबळे, अनुराधा लोखंडे, रुक्मिणी बनसोडे, सुजाता बनसोडे, सीता बनसोडे, जया बनसोडे यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या