अ.भा.मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेकडून 7 लाखाचा निधीसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करणार - अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी
रिपोर्टर:- 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या वतीने 7 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांनी दिली.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11, 12 जानेवारी 2020 रोजी उस्मानाबाद येथे संपन्न होत आहे. संमेलनासाठी संयोजन समितीच्या वतीने निधी संकलन सुरू आहे. या कार्यासाठी हातभार म्हणून जिल्ह्यातील नामांकित बहुराज्यीय उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या वतीने 7 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. सदरील रकमेचा धनादेश बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांच्याकडे सुपुर्द केला.
साहित्य संमेलनामुळे जिल्ह्यातील साहित्यिक चळवळ गतिमान होण्यास मदत होणार असून उस्मानाबादकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे. हे संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्वाही यावेळी बोलताना बँकेचे अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी, बँकेचे माजी अध्यक्ष विश्वास शिंदे यांनी दिली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, भाऊसाहेब उंबरे, बाळासाहेब शिंदे, जनता बँकेचे व्यवस्थापक महादेव गायकवाड,  अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे, कार्यवाह रवींद्र केसकर, कार्यकारिणी सदस्य आशिष मोदाणी, अग्निवेश शिंदे, बालाजी तांबे, आदीसह बँकेचे व संमेलन संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या