शेतक—यांना सरसकट मदत दया: माजी मंत्री मधुकरराव चव्हाणरिपोर्टर: परतीच्या पावसाने शेतक—यांचे अतोनात झालेले नुकसान पहाता सरकारने कुठल्याही अटी न लावता सरसकट नुकसान भरपाई दयावी अशी मागणी  माजी मंत्री मधुकरराव चव्हाण केली आहे.उस्मानाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदे मध्ये ही माहीती देण्यात आली.यावेळी कॉग्रेस चे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील,जिल्हा संघटक राजाभउ शेरखाने,शहराध्यक्ष अग्नीवेश शिंदे, लक्ष्मन सरडे,सज्जन साळुंखे आदीची उपस्थिती होती.

जिल्हयातील खरीपाची पीके पावसामुळे पुर्णपणे वायाला गेली असुन रब्बीच्या पेरणीची सुध्दा वेळ संपून गेल्यामुळे.या वर्षात शेतकरी पुर्णपणे धुळीला मीळाला आहे.त्यामुळे सरकारी यंत्रनेने कुठलेही निकस न लावता सरसकट शेतक—यांना मदत करावी या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा कॉगेस कमीटीच्या वतीने जिल्हाधिका—यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहीती चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांनी देशाची अर्थिक स्थिती मजबुत ठेवण्यात यश मिळवले होते परंतु आज देशात खिळखीळी होत चाललेली आर्थिक व्यवस्था पहाता बेकारीचे प्रमाण वाढू लागल्याचे दिसत आहे.या सगळया परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकार आपयशी ठरले असल्याचे ही चव्हाण यांनी  सांगीतले.परतीच्या पावसामुळे शेतक—यांचे नगदी पैशाचे पिक हातचे गेल्याने मराठवाडयातील शेतकरी हातबल झाला असुन त्याला आता मदतीची गरज आहे.तरी प्रशसनानी कसलाही विलंब न करता शेतक—यांना तातडीची मदत करावी आशा प्रकारची मागणी उस्मानाबाद जिल्हा कॉगेस कमीटीने केली असल्याची माहीती मा.आमदार चव्हाण यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या