महाविकास आघाडीचे सरकार स्थिर ठेवण्यासाठी समन्वय समिती


     
रिपोर्टर: राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याबाबतच्या चर्चा आता अंतिम टप्प्यात आहेत.मात्र शिवसेना,कॉग्रेस,राष्ट्रवादी या पक्षाची तत्व आणि संघटना चालवण्याचे मुददे वेगवेगळे असल्याचे पहाता आघाडीत बिघाडी होऊ नये सरकार सुरळीत चालावा यासाठी तिन्ही पक्षावर नियंत्रन ठेवण्यासाठी एक समन्वय समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहीती मीळत आहे.

या समन्वय समितीमध्ये १२ सदस्य असण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री, मंत्री आणि तिन्ही पक्षांच्या प्रमुखांसह इतर नेत्यांचा समावेश असेल असे सांगण्यात येत आहे. भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र येत असल्याने सरकार स्थापन केल्यानंतर पुन्हा कोणत्याही कारणासाठी सरकार अस्थिर होऊ नये यासाठी तिन्ही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाच्या निश्चितीसाठी वेळ लागल्याचे आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगीतले आहे.
दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची नवी दिल्ली येथे  गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी सर्व मुद्द्यांवर आपले एकमत झाले असल्याची माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबईत निवडणुकीच्या आधी आघाडीत असणाऱ्या घटकपक्षांशी चर्चा करुन त्यांना माहिती देणार असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या