ऊद्योजक प्रवीण कसपटे यांनी घेतली शरद पवार यांची भेट
रिपोर्टर: सीताफळ शेतीमध्ये देशात क्रांती घडवणारे अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष नवनाथ मल्हारी कसपटे यांचे चिरंजीव युवा ऊद्योजक प्रवीण कसपटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी कसपटे यांनी एनएमके सिताफळ भेट देवून पवार यांची भेट घेतली.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात बाजी पलटवून देशाच्या राजकारणात आपणच खरा 'चाणक्य' असल्याच शरद पवार यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे, सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या आणि देशातील प्रत्येक नेत्याच्या तोंडी एकच नाव आहे, ते म्हणजे शरद पवार. पवारांचे सिल्व्हर ओक हे निवासस्थान सध्या राजकारणाच केंद्रबिंदू बनले असुन प्रतेकांंनाच या ठीकाणी भेट देण्याची इच्छा असते. 

मुंबईतील या सिल्वर ओकमध्ये जाऊन बार्शीतील नामवंत सिताफळ उत्पादक प्रवीण कसपटे आणि विक्रम सावळे यांनी पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांना एनएमके जातीचे सिताफळ भेट देण्यात आले. एनएमके जातीच्या या बियाणाची देशभरात चर्चा आहे व मी लवकरच आपल्या फार्म ला भेट देऊ ईच्छीत असल्याची ग्वाही यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या