ठाकरे सरकारचा शपथविधी थाटात:


एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,जयंत पाटील,छगन भुजबळ,बाळासाहेब थोरात,नितीन राउत यांनी घेतली मंत्री पदाची शपथ 

रिपोर्टर: दि.28 नोव्हेबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर घेतली. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी ही शपथ उद्धव ठाकरे यांना दिली.काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरेंनी सरकार स्थापन केले.त्यानंतर जमलेल्या सगळ्या उपस्थितांना उद्धव ठाकरेंनी दंडवत घातला.
शिवाजी पार्क मैदानावर महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला.सर्वप्रथम शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.त्यांच्यापाठोपाठ एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.तर कॉग्रेसकडुन बाळासाहेब थोरात आणि नितीन राउत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
यावेळी छगन भुजबळ यांनी शपथ घेण्याआधी जय महाराष्ट्र, जय शिवराय असा नारा दिला. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करण्याआधी छगन भुजबळ यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण केले. त्यानंतर त्यांनी  मंत्रिपदाची शपथ घेतली.
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी छगन भुजबळ यांची एकेकाळी ओळख होती. पण शिवसेनेमध्ये मतभेद निर्माण झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांचे नेतृत्व स्वीकारले. त्यांनी आधी काँग्रेसमध्ये नंतर शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांनी उपमुख्यमंत्रिपदासह वेगवेगळी मंत्रिपदे भूषवली. या शपतविधीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातील मान्यवर यांच्यासह मोठया जनसमुदायाची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या