पिंपरी चिंचवड येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा
रिपोर्टर:  भारतीय संविधान दिनाचे अवचित्य साधून भाजपा पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने पक्ष  कार्यालय मोरवाडी पिंपरी येथे  भारतीय संविधान दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.

यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळ अध्यक्ष  अमित गोरखे, उपमहापौर तुषार हिंगे,नगरसेवक माऊली थोरात,बाबू नायर,अनुराधा गोरखे,राजू दुर्गे,राजेश पिल्ले,जयश्रीताई वाघमारे शैला ताई मोळक,सरचिटणीस रविजी केळकर,अनुसूचित जाती अध्यक्ष मनोज तोरडमल,कोमल शिंदे, चखाले,सागर,राजू आवळे गायकवाड,वैशाली खडये, कोमल काळभोर,संजीवनी पांडे,आशा गायकवाड, पुष्पा वायदंडे, अविंदा झेंडे,शालू महापुरे, सुमन आवळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमित गोरखे म्हणाले जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताने सर्वश्रेष्ठ संविधानाची  २६ नोव्हेंबर १९५० रोजी घटना समितीने स्वीकारले, भारतीय इतिहासातील २६ नोव्हेंबर हा दिवस ' संविधान दिन ' साजरा केला जातो, भारताचे संविधान किंवा राज्य घटना हे भारत देशाचे संविधान हे पायाभूत कायदा आहे.भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधानातील तत्वे आपणा सर्वांसाठी आदर्श आहेत.याचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कोमल शिंदे यांनी केले तसेच आपले मनोगत उपमहापौर, तुषार हिंगे,नगरसेवक माऊली थोरात,मनोज तोरडमल, राजेशजी पिल्ले,यांनी मनोगत व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या