रिपोर्टर: दिल्ली येथिल आॅल इंडीया डेव्हलपमेंट आसोसिएशन च्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रीय निर्माण रत्न पुरस्कार डिव्हीपी उद्योग समूहाचे चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आला असुन दि.22 रोजी दिल्ली येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात वेगळा ठसा निर्माण कारणा—या डिव्हीपी उदयोग समुहाने बेरोजगारांच्या हाताला काम आणि मराठवाडयातील शेतक—यांच्या उसाला योग्य भाव देण्याचे काम केल्यामुळे मराठवाडयातील शेतकरी कारखाण्याच्या बाबतीमध्ये डिव्हीपी उदयोग समुहा बददल समाधान व्यक्त करताना दिसत आहे.योग्य भाव आणि पारदर्शक व्यवहार यामुळे परिचीत आसलेल्या डिव्हीपी उदयोग समुहाची दिल्ली येथिल आॅल इंडीया डेव्हलपमेंट आसोसिएशन या नामांकीत संस्थेने दख्खल घेवून चेअरमन अभिजीत पाटील यांचा सन्मान केला यावेळी भारतीय राजदुत डॉ. व्ही.बी सोनी,मेजर वेद प्रकाश सचिव ऑल इंडिया कांग्रेस कमिटी ,पी सी नैलवाल व्हा.चेअरमन प्रवासी कोऑडीनेशन अँड वेल फेअर अॅडवायझर कमिटी उत्तराखंड सरकार ,
आमदार अलका लांबा दिल्ली,महाबली मिश्रा मेम्बर ऑफ पार्लमेंट
यांच्या हस्ते हा पुरस्कार चेअरमन अभिजीत पाटील यांना देण्यात आला.
0 टिप्पण्या