शेतक—यांना एफआरपी पेक्षा दर जास्त देऊ: चेअरमन अभिजीत पाटीलकर्मचा—यांच्या मुलींच्या नावाने 25 हजार रूपयांची ठेव: डिव्हीपी समुहाचा अभिनव उपक्रम 

कामगारांना मिळतो आपघाती विमा 
रिपोर्टर: धाराशिव साखर कारखाण्याच्या आठव्या गळीत हंगामाचा शुभंरभ महाराष्ट्र राज्य शिखर बॅंक मुंबई चे प्रशाकीय संचालक अविनाश महांगावकर यांच्या हास्ते पार पडला.
यावेळी कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील,आमदार कैलास पाटील,जिल्हा अधिकारी मागोकुळमवारे,कळंबच्या तहसीलदार लटपटे,मोहोकर,सरपंच मैदांड,साठे,चरण पाटील,सुनिल  पाटील,हिम्मत पाटील यांच्यासह डिव्हीपी उद्योग समूहाचे कार्यकारी_संचालक आधिकारी,कर्मचारी,शेतकरी,ऊस वाहतूक तोडणीदार उपस्थित होते.त्याच बरोबर कार्यकारी संचालक अमर पाटील,संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे,संदीप खारे,आबासाहेब खारे,रणजित भोसले,सुहास शिंदे,संजय खरात,विकास काळे,अभिजीत कदम,दिपक आदमिले,सुरेश सावंत,जयंत सलगर,दिनेश शिळ्ळे,सत्यजित फडे अदि संचालक उपस्थित होते. 
                     
यावेळी कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील बोलताना म्हणाले की
मागील काही काळात दुष्काळी परस्थिती असताना देखील शेतकरी बांधवांनी ऊसाची जोपासना केली त्यासाठी  दुष्काळा तुन जिवदान मिळालेल्या ऊसाची सोय व्हावी तसेच तेथील कामगारांना,वाहतूक ठेकेदारांना,ऊस तोड कामगारांच्या हाताला काम मिळेल.या उददेशाने आमच्या समुहाने हा कारखाना चालवला आहे. कारखाना घेतल्यापासून हा तिसरा गळीत हंगाम आहे.या येणाऱ्या हंगामात दोन_लाखापेक्षा जास्त टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असुन शेतक—यांना एफआरपी पेक्षा   नक्कीच चांगला दर देण्याचे आमचे मानस आहे.असे मत चेअरमन पाटील यांनी व्यक्त केले. गेल्यावर्षीपासून कामगार पगार व कारखाना यांच्या माध्यमातून कर्मचार्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्यास त्या बाळाच्या नावाने २५ हजार रूपयाची एफडी,सुकन्या_योजना म्हणून राबवण्यात येत असल्याची माहीती चेअरमन पाटील यांनी दिली.सदर कार्यक्रमावेळी   चेक चे वितरण करून लाभार्त्यांना सन्मानित करण्यात आले,कारखाण्यावर काम करणा—या वहानांना आपघाताचा धोका होवू नये म्हणून रेडिअम असेल किंवा कामगारांसाठी विमा योजना राबवण्याचा उपक्रम असेल अशा प्रकारचे आनेक नवनवे डिव्हीपी उदयोग समुहाच्या वतीने राबवण्यात येत आहेत.या कार्यक्रमाच्यावेळी    अपघात विम्याच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. कपिलेश्वर दहिटनकर यांना ३,००,०००/- रुपयांचा चेक देण्यात आला. अशा अनेक नवीन सुविधा साठी आपला कारखाना नेहमी नविन नविन योजना राबवून एक पाऊल पुढे टाकत आला आहे, आणि पुढे टाकात राहिल असे अश्वासन कारखाण्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सभासद,शेतकरी आणि कामगारांना दिले.

आमची बॅंक डिव्हीपी समुहाच्या पाठीमाघे कायम उभी राहणार:महागांवकर 

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बॅंकेचे प्रशासकीय सदस्य अविनाश महागांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतेवेळी कारखानदारीमध्ये व्यवहार हा महत्वाचा भाग असून डिव्हीपी समूहाने हाच मोठा भाग जपण्याचे काम केले आहे.म्हणूनच बॅंक डिव्हीपी समूहावर विश्वास ठेवत आहे. दोन वर्षात तीन साखर कारखाने उभा करूण उंच भरारी घेण्याचे काम डिव्हीपी समूहाने केले आहे.पुढील  काळात बॅंक आणि आम्ही सर्व डिव्हीपी समूहाच्या पाठीशी कायम उभे असल्याचे सांगीतले.
             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या