तुळजाई नगरीतील मुख्यालयात महिलांची स्वच्छतागृहा अभावी होतेय कुचंबना:महीला वर्गातुन तिव्र संताप

अनिल आगलावे तुळजापूर 

संवेदनशील सभापती व कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज


तालुक्याचा कारभार चालणा—या तुळजापूर येथिल पंचायत समीती कार्यालयामध्ये कुलूपबंद असलेल्या स्वच्छतागृहामुळे परीसरातुन कार्यालयीन कामासाठी आलेल्या महीला आणि कार्यालयातील महीला कर्मचारी यांना आडचनीचा सामना करावा लागत आहे.त्याच बरोबर इतरही महत्वाच्या सुविधा नसल्याने महीला वर्गातुन तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
 तुळजाई नगरीला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात अनन्यसाधारण महत्व आहे,स्त्री शक्तीचे आद्यपीठ म्हणून देशभर नावारूपाला आलेले शहर म्हणून तुळजापूरकडे पाहीले जाते.मात्र तालुक्यातील ग्रामपंचायतीचे मुख्यालय असणा—या पंचायत समिती कार्यालयात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने दैनंदिन कामासाठी येणाऱ्या महिला व कर्मचारी महिलांची अवहेलना होते आहे,पिण्याच्या पाण्याची सोय नाही,महिलांना स्वतंत्र स्वच्छतागृह नाही,बसायला स्वतंत्र कक्ष नाही,संपूर्ण परीसरात अस्वच्छता दिसून येते,अनेक भिंतीवर पिचकाऱ्या मारून रंगवून टाकल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत तुळजापुर पंचायत समिती मार्फत २०११ च्या ऑनलाईन, बेसलाईन सर्वेक्षना नुसार तालुका हागणदारी मुक्तची घोषणा केली गेली,मात्र पंचायत समिती या तालुका ठीकाणचे कार्यालयातील परिस्थिती मात्र ग्रामिण भागापेक्षा बीकट परिस्थिती दिसुन येत आहे.परिसरात काटेरे गवत त्यातून दर्गंधी पसरलेली दिसून येत आहे .पंचायत समिती ऑफिसमध्ये प्रत्येक कोपऱ्यात जिकडे तिकडे पिचकाऱ्यामारून रंगुन टाकत आहेत.तालुक्यातील गावे स्वच्छ व सुंदर बनतील ,ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य टिकुन राहील या उद्देशाने शासन जनजागृती पर कार्यक्रम राबवुन स्वच्छ भारत मिशन अभियान राबविला तो म्हणजे कागदोपत्रीच. "दिव्याखाली अंधार म्हणतात,, त्या प्रमाणे पंचायत समिती अधिकाऱ्यांना मात्र स्वच्छ भारत अभियानाचा पुरता विसर पडल्याचा पंचायत समिती आवारातील स्वछतागृहावरून दिसुन येत आहे.तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विविध माध्यमातून जनजागृती,समाजप्रबोधन पर कार्यक्रम घेऊन स्वच्छतेचे धडे घेतले मात्र वैयक्तिक शौचालय बांधून त्याचा वापर करावा हे खरे आहे.परंतू ग्रामीण भागात प्रत्येक घरामध्ये अर्धवट शौचालय बांधकाम करून पंचायत सामितीतील अधीकाऱ्यांना टेबलाखालुन पैसा देऊन बीले काढुन घेतली परंतु अनेक खेड्यात उघड्यावर मलविसर्जन करण्यासाठी लोटा बहाद्दर गावकुसाला दैनंदिन दिसत असल्याचे चित्र आहे.
पंचायत समिती कार्यालयासमोर लाखो रुपये खर्च करून स्वच्छता गृह उभारण्यात आले.ते स्वच्छता गृह पाण्याअभावी कायमस्वरूपी कुलूपबंद अवस्थेत बऱ्याच वर्षापासून आहे.त्यानंतर त्या स्वछता गृहात पाण्याची व्यवस्था ही करण्यात आली.परंतु त्या स्वछता गृहाची स्वछता राखली जात नसल्याने त्या स्वछता गृहा बाहेरच नागरिक व कार्यालयीन अधिकारी,कर्मचारी मूत्र विसर्जन करतात.त्यामुळे पंचायत समिती आवारात दुर्गंधी पसरली आहे.
पंचायत समिती परिसरात महिला तक्रार निवारण केंद्र असल्याने येणाऱ्या महिलांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे,
गटशिक्षणाधिकारी कार्यालय,उमेदचे तालुका कार्यालय,पाणीपुरवठा विभाग,लघुपाटबंधारे विभाग,यासारख्या सात विभागांचे प्रमुख कार्यालय यापरिसरात आहेत,परंतु या ठिकाणी महिलांकरिता स्वतंत्र असे स्वछता गृह नसल्याने शासकीय महिला कर्मचारी व ग्रामीण भागातुन येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे.
तालुक्याला स्वच्छतेची शिस्त लावणारी पंचायत समिती विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वछता गृहाचा वापर न करता त्या बाहेरील भिंतीचा आडोसा घेऊन लघुशंका करताना दिसतात असे विदारक चित्र पहायला दैनंदिन मिळते, यावर कार्यतत्पर अन संवेदनशील सभापती व कर्तव्यनिष्ठ गटविकास अधिकारी यांनी लक्ष घालणे आवश्यक आहे.

कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीमती सारिका दराडे यांच्या प्रतिक्रीया

पंचायत समिती तुळजापुर येथे दैनंदिन महिला ग्रामसेवक,उमेदच्या शेकडो महिला, महिला सरपंच, महिला शिक्षिका,अनेक कार्यालयातील महिला कर्मचारी यांना हा दैनंदिन त्रास सहन करावा लागतो आहे, मी 6 वर्षापासून या कार्यालयात काम करते आहे परंतु आद्यपपर्यंत महिलांना स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था व स्वच्छतागृह उपलब्ध करून देता आली नाही याचा खेद वाटतो अन अधिकारी म्हणून काम करत असताना महिला आजही उपेक्षित व दुर्लक्षित असल्याचीच जाणीव ही होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या