उस्मानाबाबाद जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसुचित महीलासाठी आरक्षीत...


रिपोर्टर: जिल्हापरीषदेच्या विदयमान अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा कार्यकाल समाप्त झाला असुन उस्मानाबाद जिल्हापरीषदेसाठी अध्यक्ष पदाच्या झालेल्या सोडत पध्दतीनुसार अनुसूचित जाती ( महिला ) प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव झाले आहे.अता जिल्हापरिषदेच्या अध्यक्ष पदावर कोण विराजमान होणार याकडे जिल्हावाशियांचे लक्ष लागले आहे.

पुढील महिन्यात जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. अनुसूचित जाती ( महिला ) प्रवर्गासाठी अध्यक्षपद राखीव झाले आहे. या पदावर भाजपकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवदास कांबळे यांची कन्या अस्मिता कांबळे यांचे नाव आघाडीवर आहे. तर सदस्या आणि विद्यमान सभापती चंद्रकलादेवी नारायणकर यांचे नाव दोन नंबरवर आहे. शिवसेनेकडून नितीन शेरखाने यांच्या पत्नी अजंलीताई शेरखाने यांच्या नावाचीही चर्चा आहे.
 उपाध्यक्ष पदावर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता आहे.मावळते अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या कडे भाजपचे गट नेते पद येण्याची शक्यता आहे.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी २६, काँग्रेस १३, शिवसेना ९, भाजप ४ आणि बंडखोर शिवसेना २, असे संख्याबळ होते. मागील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजप आणि बंडखोर शिवसेना यांची आघाडी झाली होती. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासह एक सभापती पद राष्ट्रवादीला, दोन सभापती पद भाजपला तर एक सभापती पद बंडखोर शिवसेनेला देण्यात आले होते.मात्र आता पुढील होणा—या निवडीमध्ये सभापतीपद आणि अध्यक्षपद कोनाला मिळणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या