80 तासात कोसळले फडनवीस सरकार : उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा


अखेर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा


रिपोर्टर: अजित पवार यांनी राजीनामा देताच काही वेळात आमच्याकडेही बहुमत उरलेले नाही त्यामुळे मी राजीनामा देत असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी माध्यमाशी बोलताना सांगीतले.यामुळे महाविकास अघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी मार्ग मोकळा झाला असुन उध्दव ठाकरे मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामार्तब झाल्याचे दिसत आहे. 

 अजित पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. व्यक्तीगत कारणामुळे राजीनामा देतो आहे हे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. अवघ्या साडेतीन दिवसात अजित पवारांचे बंड शमवण्यात शरद पवार यशस्वी झाले. एवढेच नाही तर दिल्लीत गेल्यावर सोनियांशी चर्चा, मोदींशी चर्चा या सगळ्या गोष्टी घडवून अख्खा महिनाभर चर्चेतही राहिले. अजित पवारांनी राजीनामा दिल्याने मीदेखील राजीनामा देतो आहे असे फडणवीस यांनी जाहीर केले. त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. आता शरद पवार यांच्या निवडणुकीच्या आधीच्या आणि निकालानंतरच्या लढ्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर रहावे लागले. भाजपाच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास त्यांनी शरद पवार यांनी त्यांच्या खास डावपेचांनी हिरावून घेतला. त्यामुळे शरद पवार यांचे राजकीय महत्त्व  पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे यात शंका नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आमच्यासोबत आल्याने आम्ही सत्ता स्थापन केली होती. आता अजित पवारच आमच्यासोबत नाहीत त्यामुळे आमच्याकडे बहुमत नाही.आम्ही आमदार फोडणार नाही.असे म्हणत फडनवीस यांनी राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांनी शपत विधी उरकून महाराष्ट्राला मोठा राजकीय धक्का दिला होता.या शडयंत्राच्या मागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा हात असल्याच्या वावडया महाराष्ट्रभर उडत असतानाच दि.26 नोव्हेबर रोजी फडनवीस आणि अजित पवार यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यासाठी मार्ग मोकळा झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या