स्वच्छ चारित्र्य ठेवत विकास साधणारे आ.बसवराज पाटील यांना परत एकदा विधानसभेत पाठवा - शिवराज पाटील चाकूरकर.

 रिपोर्टर:-स्वतःचे चारित्र्य स्वच्छ ठेवत मतदारसंघाचा विकास साधणारे आमदार बसवराज पाटील यांना औशाच्या नागरिकांनी परत एकदा विधानसभेत पाठवावे असे आवाहन देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले ते आज औसा येथे आयोजित आ.बसवराज पाटील यांच्या प्रचार शुभारंभ सभेत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री आ.मधुकरराव चव्हाण, शैलेश पाटील चाकूरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, नारायण लोखंडे, स्वयंप्रभा पाटील, दत्तात्रय कोळपे, श्रीकांत सूर्यवंशी, गणेश माडजे,रशीद शेख, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेषेराव पाटील,नारायण लोखंडे, शकील शेख आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना पाटील म्हणाले दहा वर्षांपूर्वी आपण लोकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत आ.पाटील यांना विधानसभेत पाठवले, गेल्या दहा वर्षात या मतदारसंघात चौफेर विकास साधण्याचं काम आ.बसवराज पाटील यांनी केले आहे येत्या काळात पण त्यांना आपण परत एकदा निवडून द्यावं असे सांगत आज देशातील तरुणांना रोजगाराची गरज असल्याचे नमूद केले आमच्या सरकारच्या काळात आम्ही लोकांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी मनरेगा योजना सुरू केली त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना वर्षातील किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध झाला, त्याच बरोबर अन्न सुरक्षा सारखा एक ऐतिहासिक कायदा त्यामुळे उपाशी पोटी राहणाऱ्यांची संख्या प्रचंड कमी झाली याशिवाय शेतकऱ्यांना न भूतो अशी कर्जमाफी दिल्याचे त्यांनी सांगितले पुढे बोलताना पाटील म्हणाले औसा मतदारसंघातील जनतेने दिलेल्या पाठबळामुळेच मला लोकसभेत आपलं आठ वेळेस प्रतिनिधित्व करता आले आपण मंडळींनी असेच प्रेम आ.पाटील यांच्यावर ठेवावे असे आवाहन पण त्यांनी केले.


विकासाची गंगा अविरत राहणार- आ.बसवराज पाटील.

 गेल्या दहा वर्षांपासून औसा मतदारसंघात आलेली विकासाची गंगा अविरत सुरू राहणार असल्याचे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना आ.पाटील म्हणाले औसा विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला खूप प्रेम दिले आहे, गेल्या दहा वर्षात मतदारसंघात सामाजिक सलोखा कायम राखत विकास साधता आल्याचे सांगत मतदारसंघात विकासाची चळवळ सुरू केली येत्या काळात बेरोजगारांच्या हाताला काम देण्याच्या उद्देशाने मतदारसंघात नवीन उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले, गेली वर्ष मी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले पण एकदाही खोटं बोलून आपली मतं घेण्याचा प्रयत्न केला नाही असे सांगत उद्याच्या 21 तारखेला आपण मला परत संधी द्या असे आवाहन त्यांनी केले
यावेळी माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.बसवराज पाटील यांनी केले तर आभार श्रीपतराव काकडे यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या