एकमेका सहाय्य करू अवघे धरू मतदार!


 
रिपोर्टर: युती असली तरी आपआपल्या परीने आर्तंगत जेवढा विरोध करता येईल तेवढा विरोध करून नेहमीच कुरघोडीचे राजकारण करणारे नेते एकत्र येवून ’एकमेका सहाय्य करू अवघे धरू मतदार’ आशा प्रकारची चर्चा करताना दिसत आहेत.
शिवसेना आणि भाजपाची युती जग जाहीर असली तरी उस्मानाबाद जिल्हयातील सेना भाजपाच्या कुरघोडया थांबलेल्या दिसत नाहीत. उस्मानाबाद जिल्हयातील चार मतदार संघापैकी तीन मतदारसंघ सेनेकडे तर एक मतदारसंघ भाजपाकडे आहे. मागील काही दिवसामध्ये शिवसेना नेते आणि भूम-परंडा-वाशीचे उमेदवार प्रा.तानाजी सावंत यांनी स्वबळाचा नारा देत भाजपाच्या विरोधात दंड थोपटले होते. तर त्याला प्रति उत्तर देत आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी सावंत यांना ’चार दिसात अन कोल्ह उसात’ अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला होता. शिवसेनेच्या कैलास पाटील यांची उमेदवारी दाखल करतेवेळी उस्मानाबाद मतदार संघात खासदार निंबाळकर यांनी मित्र पक्षाचेच उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना पराभूत करण्यासाठी पुर्ण ताकत लावू असे विधान केले होते. यावर जिल्हयातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी संताप व्यक्त करत भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारणीला सदर बाबीचा अहवाल सादर केला होता. तेव्हा दोन्ही पक्षाच्या श्रेष्ठींनी भाषेला लगाम घालण्याचे आदेश खासदार, आमदार आणि पदाधिकार्‍यांना दिले होते. आमदार सुजितसिंह ठाकूर आणि आमदार सावंत यांच्या दोघांच्या अंतर्गत भांडणामुळे परंडा आणि तुळजापूर मतदारसंघामध्ये दोन्ही पक्षाचे  अंतर्गत कलह चवाटयावर आले होते. परंडा मतदार संघामध्ये भाजपाचे कार्यकर्ते सेनेच्या प्रचारात भाग घेत नसल्याचे चित्र दिसताच.आपला अंहकार मागे घेत विधानसभेला होणारे नुकसान टाळण्यासाठी आमदार ठाकूर आणि आमदार सावंत, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, खासदार निंबाळकर यांनी परंडा येथे बैठक घेवून ”एकमेका सहाय्य करू” अशी भुमीका घेतल्याचे दिसत आहे. यामध्ये माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावल्याचे दिसत आहे. मात्र या एकत्रित बैठकीचे पडसाद विधानसभेच्या निकालावर किती उमटणार हे पहाणे गरजेचे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या