रिपोर्टर: कॉप्टन संकेत चेडे यांनी भुम,परंडा,वाशी मतदार संघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.शिवसेनेच्या अंतर्गंत गटबाजीला कंटाळून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समजत आहे.
सुरवातीपासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहीलेले कॉप्टन संकेत चेडे यांनी मतदार संघातील अंतर्गंत गटबाजीमुळे आणि पक्षाकडे उमेदवारी मागुन ही पक्षानी त्यांची दख्खल न घेतल्याने नाराज होवून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.भुम,परंडा,वाशी मतदारसंघामध्ये पालकमंत्री सावंत यांनी पक्षाचा विस्तार करण्यासाठी इतर पक्षातील प्रतिनिधींना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला असल्याने पुर्वीपासुन शिवसेनेचे काम करणारे पदाधिकारी नाराज असल्याचे समजत आहे.त्यामुळेच भुम,परंडा,वाशी मतदारसंघामध्ये शिवसेनेला बंडखोरीचा सामना करावा लागणार असल्याचे असे चित्र दिसत आहे.कॉप्टन संकेत चेडे,सुरेश कांबळे यांच्या माध्यमातुन शिवसेनेला खिंडार पडल्याचे पहायला मिळत आहे.
0 टिप्पण्या