औशात पुन्हा बसवराज पाटील ?रिपोर्टर: केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्याने औसा मतदार संघाचे चित्र पालटणार का? याकडे लातुरसह उस्मानाबाद जिल्हयाचे लक्ष लागले आहे.परंतू औसा मतदार संघात पुन्हा बसवराज पाटील आमदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे.


बसवराज पाटील यांच्या उमरगा तालुक्यातील कॉग्रेसची जागा आरक्षीत असल्याने पाटील यांनी औसा मतदार संघातुन निवडणूक लढवून नेहमीच विजय हाशील केला आहे.परंतु 2014 ला केंद्रात आणि राज्यात भजपाचे सरकार आल्याने यावेळी औशाचा आमदार ​कोण होणार या बाबत संभ्रम असल्याचे चित्र होते.मात्र आमदारकीच्या काळातील विकास कामे पहाता यावेळीही औशाचे आमदार बसवराज पाटीलच होणार असल्याचे चित्र जवळपास निश्चीत दिसत आहे.भाजपाचे उमेदवार हे मुख्यमंत्री यांचे जवळचे असले तरी त्यांची जादू या मतदारसंघात चलली नसल्याचे बोलले जात आहे.एकंदरीतच विकास कामे आणि जनसंपर्कासह लोक​प्रियता पहीली तर औसा मतदार संघातील जनतेने बसवराज पाटील यांना कौल दिलेला दिसत आहे.गेल्या 30 वर्षाच्या कार्यकाळातील औसा तालुक्यातील विकासाचा आलेख पाहीला तर सगळीकडेच बसवराज पाटील यांचे नाव घेतले जात आहे.महत्वाचे म्हणजे सर्व जाती धर्माला घेवून चालणारा नेता म्हणून बसवराज पाटील यांची ओळख असल्याने औशामध्ये बसवराज पाटीलच विजय खेचून आणनार आसे बोलले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या