लक्ष्मी आली घरा :अँड.धाराशिवकर यांच्या शंकर प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम:

रिपोर्टर: मुलगी लक्ष्मीचेच रुप असुन तिचा सांभाळ,जतन झालेच पाहीजे.या उद्देशाने दिवालीच्या लक्ष्मी पुजना दिवशी रात्री बारा पासुन चालु झालेला संपुर्ण दिवस रात्री बारा पर्यंत जिल्हा शासकिय रूग्णालयात जेवढया मुली जन्म घेतील त्या सर्व मुलींच्या नावाने 7 हजार रूपये टाकुन मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यात येते.हा उपक्रम अँड.राजेंद्र धाराशिवकर यांचे दिवंगत वडील कै.शंकरराव धाराशिवकर यांच्या स्म्रृती प्रित्यर्थ शंकर प्रतिष्ठानच्या वतीने प्रतेक वर्षी राबवण्यात येतो.

उ,बाद येथील जेष्ठ विधिज्ञ अँड.राजेंद्र धाराशिवकर यांचे दिवंगत वडील कै.शंकरराव धाराशिवकर यांच्या स्म्रृती प्रित्यर्थ स्थापण केलेल्या प्रतिष्ठाणने अत्यंत ह्रद्य,संवेदनशिल असा उपक्रम हाती घेतला आहे. प्रतिष्ठाणचे हे अकरावे वर्ष तर या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे.लक्ष्मी आली घरा हा उपक्रम समाजाच्या जडणघडनीत अत्यंत मोलाचा आहे.स्त्रीभ्रृण हत्त्याचा विपर्यास समाजाची संवेदनशिलताच नष्ठ करू पहातेय.आज समाजात अत्यंत कमी झालेले मुलींचे प्रमाण व यातून निर्माण झालेली अत्यंत चिंताजनक स्थीती या कडे समाजाने अत्यंत गांभिर्याने बघने आवश्यक आहे.मुलगी लक्ष्मीचेच रुप असुन तिचा सांभाल,जतन झालेच पाहीजे.या उद्देशाने हा उपक्रम राबवला जात आहे.दिवालीच्या लक्ष्मी पुजना दिवशी रात्री बारा पासुन चालु झालेला संपुर्ण दिवस रात्री बारा पर्यंत जेवढे कन्यारत्न जन्म घेतील त्या सर्व मुलींच्या नावाने एक्कोनीस वर्ष मुदतीची रु.७००० ची ठेव उस्मानाबाद येथील समर्थ अर्बन बँकेत ठेऊन त्याची ठेव पावती मुलींच्या आईस दिली जाते.या मुलीस मुदती नंतर ३३५५० रुपये मिळतात.अशा जेवढ्या मुली उस्मानाबाद येथील शासकिय रुग्णालयात जन्म घेतील त्यांचा सन्मान केला जातो.हाच कार्यक्रम येथील शासकिय रुग्णालयात दि.२८ नोव्ह. रोजी संपन्न झाला.कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून येथील जेष्ठ फिजीशियन डाँ.सतिश पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जेष्ठ बालरोग तज्ञ डाँ.अभय शहापुरकर,रुग्णालयाचे प्रमुख डाँ.सचिन देशमुख,प्रगती पत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत पाटील,डाँ.मनोज घोगरे,नगरसेवक सोमनाथ गुरव,समर्थ बँकेच्या संचालिका सौ.अलका धाराशिवकर व संपुर्ण कुटुंबीय,नातलग,समर्थ बँकेचे व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी ईतर मान्यवर तसेच रुग्णालयातिल कर्मचारी,नागरिक मोठ्या संखेने उपस्थीत होते.सुरुवातीला प्रतिष्ठाणची व या उपक्रमा मागची भुमिका प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अँड.राजेंद्र धाराशिवकर यांनी विशद केली.समाजातुन या उपक्रमात सहभाग वाढावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.यावेली सर्व मान्यवरांनी यथोचीत विचार व्यक्त केले.या पुढच्या कालात आपणही या कार्यक्रमात योगदान देऊ असे डाँ.सतिश पवार व श्री प्रशांत पाटील यानीही उस्त्फुर्त पणे जाहीर केले.आभार व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ऋषिकेश धाराशिवकर यांनी केले.अत्यंत अल्प सुविधा व कर्मचारी असताना सुध्दा या रुग्णालयात अत्यंत दर्जेदार सेवा व वैद्यकिय मदत दिली जाते या बाबत डाँ देशमुख व  सर्व कर्मचार्यांचे अभिनंदन केले.उस्मानाबाद सारख्या शहरात एवढ्या उंचिचा,कार्यक्रम संपन्न होतोय ही उल्लेखणीय बाब आहे समाजानेही एक पाऊल पुठे येऊन संयोजकांच्या उपक्रमाचा भाग व्हावे असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या