सुरेश कांबळे यांचा शिवसेनेचा राजीनामा तर वंचितची उमेदवारी
रिपोर्टर:शिवसेनेचे भुम तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी आंतर्गंत गटबाजीला कंटाळून शिवसेना तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला असुन कांबळे यांना वंचितकडून उमेदवारी मिळाल्याचे समजत आहे.   


अंतर्गत गटबाजीला कंटाळून सुरेशभाऊ कांबळे यांनी शिवसेना भूम तालुका प्रमुख पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख गौतम लटके यांच्याकडे पाठवला आहे. परंडा मतदार संघातुन कांबळे हे शिवसेना पक्षाकडे उमेदवारी मागत होते.परंतू त्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले सुरेश कांबळे यांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवून शिवसेनेच्या तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. भुम,परंडा,वाशी मतदार संघामध्ये कांबळे यांचा चांगला परिचय असल्याने त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षीत होते.कांबळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागुनही पक्षाने त्यांचा विचार न केल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देवून वंचित बहुजन आघाडी पक्षाचा त्यांचा मतदार संघात चागलाच परिचय व संपर्क आहे .पक्षाने त्यांचा विचार केला नाही म्हनुन राजेनामा दिला असे कळते आहे एबी फार्म हास्तगत केला आहे.दरम्यान कांबळे हे उदया वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या