राज्यात मतदानाचा टक्का घसरला
 रिपोर्टर: महाराष्ट्र राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांसाठी दि.21 आक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. मात्र 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले आहे.

 राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाच्या हजेरीमुळे मतदारांनी घराबाहेर पडणे टाळले.काल 6 वाजेपर्यंत राज्यात सरासरी 55.31 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.
288 मतदारसंघांसाठी जवळपास केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 350 तुकड्यांसह सुमारे तीन लाख पोलिसांचा बंदोबस्त राज्यभरात तैनात होता.राज्यात तुरळक ठिकाणी मतदान केंद्रांवर उमेदवार व कार्येकर्ते यांच्या हाणामाऱ्या सोडल्या तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. राज्यात ईव्हीएम बिघाडीच्या जवळपास 221 तक्रारी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या