उस्मानाबादच्या राजकारणात कमालिची चर्चा करायला लावणारा फोटो


महाराष्ट्र लाईव्ह रिपोर्ट 
आजपर्यंत राष्ट्रवादीचे मैदान गाजवाणारे माजी मंत्री आमदार राणजगजितसिंह पाटील यांनी मागील दोन महिण्यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील राजकारणामध्ये वेगळीच चर्चा करण्यासाठी लोकांना भाग पाडले.त्याचाच एक प्रत्यय म्हणजे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बरोबरचा राणजगजितसिंह पाटील यांचा सोशल मिडीयावरती वायरल झालेला फोटो. इथुन मागच्या उस्मानाबाद जिल्हयाच्या राजकारणामध्ये शिवसेना कायमच राणजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात उभी राहीलेली आहे.त्यातुनच ओमराजे निंबाळकर यांचे कटटर विरोधक म्हणून राणजगजितसिंह पाटील यांची ओळख आहे. अशी संगळी परिस्थिती असताना सुध्दा राणजगजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करूण उस्मानाबादसाठी नविन राजकीय समीकरणे तयार केली आहेत.कायम जनतेचे काम करूण लोकसभेला झालेला पराभव हा राणजगजितसिंह पाटील यांना विचार करायला लावणारा विषय बनला होता. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील मतदारांनी दिलेला कौल राणजगजितसिंह पाटील यांनी बारकाईने पडताळुन पाहीला आणि तिथेच पाटील यांनी निश्चय करूण राष्ट्रवादीला सोडण्याच्या हालचाली चालु केल्या आफवा म्हणत म्हणत राणजगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करूण उस्मानाबाद जिल्हयातील जनतेला लोकसभेच्या पराभवापेक्षा मोठा धक्का दिला.राणजगजितसिंह पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या उलट सुलट चर्चा संगळीकडे चालु आसताना खासदार ओमराजे यांनी पाटील यांच्या विरोधात राजकारणाची मोट बांधण्यास जोरदार तयारी केली परंतु उस्मानाबाद जिल्हयातील शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी पहाता संपुर्ण जिल्हयातील सेना राणजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात उभी करणे ही गोष्ट खासदार ओमराजे निंबाळकर यांना शक्य होणारी नाही.परंतु राणजगजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करताच पाटील यांचे राजकारण संपून टाकण्याचे वक्तव्य ओमराजे यांनी केले होते.त्यामुळे राणजगजितसिंह पाटील यांच्या विरोधात फळी उभी करण्याचे काम ओमराजे यांनी सतत चालु ठेवलेले दिसत आहे.त्यातुनच भाजप सेना युती असली तरी  राणजगजितसिंह पाटील यांना सेनेच्या ठरावीक लोकांचा विरोध असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यातुनच राणजगजितसिंह पाटील यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतल्याने अनखिनच चर्चेचा विषय बनलेला दिसत आहे.राणजगजितसिंह पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटील हे विधानसभा कुठून लढवणार या बाबत संगळया जिल्हयामध्ये चर्चा सुरू झाली.उस्मानाबाद भाजपला आणि तुळजापूर सेनेला मिळावे असा प्रयत्न राणजगजितसिंह पाटील यांनी केला परंतु कळंब हा सेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेने उस्मानाबाद मतदारसंघ सोडला नाही.त्यामुळे राणजगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदार संघातुन लढण्यसाठी भाजपने तिकीट दिले. परंतु तुळजापूर मतदार संघात उमेदवारांची गर्दी आणि आमदार मधुकरराव चव्हाण यांच माध्यमातुन समोर तगडा उमेदवार असल्याने ही लढत चांगलीच टप होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
राणजगजितसिंह पाटील हे सयंमी आणि वैचारीक असल्याने त्यांनी उस्मानाबाद जिल्हयातील राजकारण फार निरखून पाहीलेले आहे.
त्यामुळेच परंपरेचे राजकारण बदलून राणजगजितसिंह पाटील भाजपाच्या गोटात दाखल झाल्याचे बोलले जात आहे.भाजपमध्ये केलेला प्रवेश आणि शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांची घेतलेली भेट पाहता राणजगजितसिंह पाटील यांच्या राजकीय भवितव्याला या गोष्टीचा काय फायदा होणार याकडे उस्मानाबाद जिल्हयातील मतदारांचे लक्ष लागले आहे.   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या