अजित पिंगळे यांच्या रॉलीने वेधले सर्वांचे लक्ष: प्रचंड प्रतिसादाने कळंब आणि उस्मानाबाद येथे निघाली रॉली:

रिपोर्टर:

उस्मनाबाद,कळंब मतदार संघाचे अपक्ष उमेदवार अजित पिंगळे यांनी आज कळंब येथे रॉलीचे आयोजन केले होते.रॉलीला भरभरून मिळालेल्या प्रतिसादामुळे राजकीय क्षेत्रातील सर्वांचे लक्ष वेधले होते.

पुर्वीपासुनच शिवसेनेचे निष्ठावंत असलेले अजित पिंगळे यांना गटबाजीमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने पिंगळे यांनी अपक्ष लढा देण्याचे ठरवले मतदारसंघातील मोठया प्रमाणात जनता त्यांच्या पाठीशी उभी राहीली आणि पिंगळे यांना अपक्ष असताना संगळयांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळू लागला.आज 19 तारखेला प्रचार संपुष्ठात येत असल्याने अजित पिंगळे यांनी आपली ताकत दाखवण्यासाठी मतदार संघातील कळंब आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरात प्रचार रॉलीचे आयोजन केले होते.दोन्ही ठिकानी रॉलीला मोठया प्रमाणा गर्दी असल्याने मतदारसंघात अपक्ष उमेदवारच वरचड होणार असल्याचे संकेत दिसले.सेनेतील एक गट मोठया प्रमाणात पिंगळे यांना मानणारा आहे. त्यामुळे सेनेतुन बंडखोरी जरी केली असली तरी पिंगळे हे सेनेच्या उेदवाराला वरचड होवू शकतात हे तेवडेच खरे आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या