माता तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीला जागतीक पर्याटन स्थळ बनवणार:अमित शहा




रिपोर्टर: शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या तुळजापूर नगरीतील तुळजाभवानीचे महात्म्य जगभर पोहचवण्यासाठी तुळजापूरला जागतीक पर्याटन स्थळाचा दर्जा देण्याचे काम आम्ही करणार आहोत.असे आश्वासन केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केले.तुळजापुर येथे महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान अमित शहा बोलत होते.

 स्वराज्य आणि सुराज्य बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात काम करीत आहेत,आपण ही राणा पाटील यांना बहुमताने निवडून द्यावे अन राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावे असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या वेळी केले.
यावेळी पालकमंत्री तानाजी सावंत, सहकारमंत्री सुभाष देशमुख,प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर,माजी खासदार पदमसिंह पाटील,प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे,ऍड.अनिल काळे,मिलिंद पाटील,सुधीर पाटील,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, खंडेराव चौरे,ऍड.व्यंकट गुंड,रोहन देशमुख, मल्हार पाटील,बापूसाहेब कणे,सत्यवान सुरवसे,देवानंद रोचकरी, राजाभाऊ ओव्हळ, सोमनाथ कांबळे,अर्चनाताई पाटील,नंदाताई पुनगुडे,ऍड.क्रांतीताई थिटे,शामल वडणे,पूजा देडे,मीना सोमाजी,संगीता कदम,सुलभाताई पाटील,नागेश नाईक,गुलचंद व्यवहारे,विकास मलबा,प्रभाकर मुळे,सुहास साळुंखे,रामदास कोळगे,दत्ता सोनटक्के,दिपक आलूरे,गणेश सोनटक्के,पूजा राठोड वृरुडकर,आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना शहा म्हणाले की महाराष्ट्र राज्य आज सर्वच क्षेत्रात नंबर एक वर आहे 15 वर्षे  काँग्रेस ने भ्रष्टाचार केला अन राज्य भकास केलं,देवेंद्र सरकारने एक स्थिर सरकार बनवल,आजपर्यंत एक पण आरोप देवेंद्र यांच्यावर झाला नाही त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण राणा पाटील यांना बहुमताने निवडून देवून भारतीय जनता पार्टीला सहकार्य करावे. 
देशाचे संरक्षण असो देशाच्या विस्तारा बाबत 370 कलम हाटवण्याचा मुददा असो आशा प्रकारचे देश हिताचे निर्णय पंतप्रधान मोदी ने घेतले आहेत.त्याच बरोबर उस्मानाबाद जिल्हयातील सोलापूर तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम लवकरच होणार असून त्यामधुन जिल्हयाचा विकास साधणार आहे.असे मत शहा यांनी व्यक्त केले. 

यावेळी बोलताना राणा पाटील म्हणाले की,तुळजापूरच्या विधानसभा भगवा नक्की फडकणार,मतदानाच्या माध्यमातून आशीर्वाद द्या,आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे काम करण्याची संधी द्यावी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या सरकारकडून आपल्याला जिल्हा सुजलाम सुफलाम करण्यासाठी आणि सोलापूर उस्मानाबाद रेल्वेच्या कामासाठी केंद्र सरकारकडून  निधी उपलब्ध करून घ्यावा लागेल, तात्काळ निधी द्यावा अशी विनंती  राणाजगजितसिंह पाटील यांनी आपल्या भाषणात केली.
यावेळी बोलताना आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणाले की देशात सरदार पटेल यांच्यानंतर दुसरे सरदार देशाला मिळाले असून देशात पंतप्रधान नरेंद मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी अनेक धाडशी निर्णय घेऊन आपली भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट केली असल्याचे मत आमदार ठाकुर यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी प्रदेश कार्यकरणी सदस्य नितीन काळे,सुधीर पाटील,ऍड.अनिल काळे,दत्ताभाऊ कुलकर्णी,रोहन देशमुख,देवानंद रोचकरी,ऍड,व्यंकट गुंड,शामल वडणे,खंडेराव चौरे,राजाभाऊ ओव्हाळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नाईक यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या