अदित्य यादवने मिळवून दिले महाराष्ट्राला कास्य पदकरिपोर्टर: दिल्ली येथे स्थल सेना कॅंपचे 52 मराठा बटालीयन मधुन महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करूण अदित्य यादव याने महाराष्ट्राला कास्य पदक मिळवून दिले आहे.या यशा बददल आमदार डि.पी.सावंत यांनी नांदेड येथे अदित्यचे अभिनंदन केले.यावेळी नांदेड येथिल महात्माफुले हायस्कुलच्या मुख्यध्यापीका एम.एन जेस्वाल,सह शिक्षक आर के शिंदे यांच्यासह अदित्यचे आई वडील यांची उ​पस्थिती होती.

नांदेड येथिल शारदा भवन सोसायटीच्या महात्माफुले हायस्कुलमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणारा अदित्य यादव याने आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शखाली आणि जिदद आणि चिकाटीच्या जोरावर दिल्ली येथे स्थल सेना कॅंपचे 52 मराठा बटालीयन मधुन महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत  कास्य पदक मिळवून महाराष्ट्राचा मान वाढवण्याचे काम अदित्य याने केले आहे.दिल्ली कॅंपसाठी महाराष्ट्रातुन 7 विदयार्थ्यांची निवड करण्यात आली होती त्यामध्ये अदित्य हा मराठवाडयातुन एकमेव विदयर्थी होता.   अदित्य याने जिल्हा पातळीवरूण संगळया स्टेप पार करत दिल्ली येथे मजल मारूण कास्य पदक मिळवल्यामुळे सर्व स्तरातुन त्याचे कौतूक होत आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या