विधानसभा निवडणुकीतील प्रचारतोफा थंडावल्या:एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात:
 रिपोर्टर: राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान दोन दिवसांवर येऊन ठेपले असून विविध राजकीय पक्षांची प्रचाराची मुदत शनिवारी 6 वाजता संपली असुन विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 288 मतदारसंघात एकूण 3 हजार 239 उमेदवार निवडणूक रिेंगणात आहेत.

 सोमवारी (21 ऑक्टोबर रोजी) राज्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. सर्वात जास्त 246 उमेदवार पुणे जिल्ह्यातून, तर सर्वात कमी 23 उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडणूक लढवत आहेत.राज्यात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदारांची नोंदणी झाली आहे. असे असेले तरी मतदानाचा टक्का वाढेल का, हाच खरा प्रश्न आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या