उर्मिला,कृपाशंकर यांचा कॉग्रेसला रामरामरिपोर्टर:काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्यासह काँग्रेसचे  माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.


मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांनी पक्षाचा राजीनामा दिला असुन ते कुठल्या पक्षात जाणार आहेत हे मात्र ठरले नाही नसल्याचे कळतय.त्याचबरोबर अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेतल्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनीही आपला राजीनामा   पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवला आहे.सिंग हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. तर उर्मीला मातोंडकर मात्र कुठल्या पक्षात जाणार हे स्पष्ट नाही. उर्मीला यांच्या राजीनाम्या नंतर  काँग्रेसला हा  दुसरा धक्का आहे. आघाडी सरकारमध्ये गृह राज्यमंत्री मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष तसंच राज्यातील काँग्रेसच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या पदांवर सिंग यांनी काम केले आहेत. संजय निरुपम यांच्या मुंबई अध्यक्षपदाचे नियुक्तीनंतर काँग्रेसमध्ये ते पक्षात अस्वस्थ होते. गेली दोन वर्ष मुख्यमंत्री गणपतीचे निमित्ताने यांच्या घरी आवर्जून हजेरी लावत होते. याच माध्यमातूनं ते मुख्यमंत्र्यांशी जवळीक साधत होते.त्याचबरोबर सिंग हे भाजपातील दिल्लीतील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी उत्तर भारतीय म्हणून संपर्कात राहिलेले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या