
पुढच्या पाच वर्षात या मतदार संघात पाणी नाही आनले तर
जिल्ह्याची शिव ओलांडणार नाही सावंत यांची शपत
रिपोर्टर: कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे पाणी पाच वर्षात या मतदार संघात जर नाही आनले तर या जिल्हयाची शिव ओलांडणार नाही आशी शपत जिल्हयाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी वाशी येथे संकल्प मेळाव्यात बोलताना घेतली.
दि. १७ सप्टेबर रोजी शिवसेनेच्या वतीने वाशी येथे प्रशांत चेडे यांच्या माध्यमातुन संकल्प मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले हाते.या कार्यक्रमात मंत्री डॉ.प्रा.तानाजी सावंत हे बोलत होते.यावेळी
यावेळी बोलताना मंत्री तानाजी सावंत यांनी जिल्ह्यासह परांडा मतदार संघाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या कृष्णा -भीमा स्थिरीकरण योजनेतील पाण्याची पहिली धार हि याच मतदार संघात आणणार असल्याचे सांगून जलसंधारण मंत्रिपद मिळाल्यापासून तीन आठवड्यात ६६० बंधारे मंजूर केल्याचे सांगितले.ज्या लोकांनी पंधरा वर्षात मतदारसंघात केवळ पाणी आणण्याची
आश्वासने दिली त्यांनी आणलेल्या पाण्यानी भरलेली पाझर तलाव पाहण्याची गरज आहे.त्याच बरोबर पुढच्या पाच वर्षात संपूर्ण जिल्हा
पाणीदार करण्याचे वचन सावंत यांनी दिले. याला विरोध केला तर हिसकावून अनु असे सांगून पुढच्या पाच वर्षात पाणी नाही अणूशकल्यास जिल्ह्याचे शिव न ओलांडण्याची
शपथ वाहिली. त्याच बरोबर मतदारसंघातील ३८०० महिला बचत गटांना तानाजी सावंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रत्येकी अकरा हजार मदत करण्यात येऊन गटांनी तयार केलेली प्रत्येक वस्तू स्वतः खरेदी करून या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यास सुरुवात केली आहे व हि संकल्पना संपूर्ण जिल्हाभरात राबवून महिलांना बँकांच्या दारी न जाऊ देता त्यांचे सक्षमीकरण करण्याचा मानस देखील त्यांनी यावेळी व्यक्त करून मागच्या पंधरा वर्षात केवळ प्रशिक्षण व मेळावे यामधून महिलांची दिशाभूल करणाऱ्यावर कधी काढलेले कर्ज कशा फेडणार याचा विचार केला का म्हणतात टीका केली. यावेळी प्रशांत
चेडे यांनी बोलताना केवळ मतदार संघाचा विकास तानाजी सावंत हेच करू शकतात म्हणून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेत प्रवेश केला असल्याचे सांगितले. या वेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, प्रशांत चेडे, नगराध्यक्ष

पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन वाशी नगरपंचायतीचे गटनेते प्रसाद जोशी यांनी केले.
0 टिप्पण्या