सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात मंदी : आनेकांचे संसार होतायत उध्वस्त < शरद पवार

  रिपोर्टर: सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात मंदीची लाट आली आहे मात्र सरकार देशातील जनतेचे लक्ष दुस—याच मुदयाकडे घेवुन जात आहे.त्यामुळे दर दिवसाला मोठया संख्येने व्यावसाय बंद पडुन लाखोंच्या संख्येने लोक बेकार होत आहेत असे मत राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उस्मानबाद येथे शिवस्वाराज्य यात्रे दरम्यान बोलताना  व्यक्त केले.

दि.17 सप्टेबर रोजी उस्मानाबाद येथे शिवस्वराज्य यात्रे निमीत्त खुदद शरद पवार यांनी उस्मानाबाद येथे हाजेरी लावली होती.यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुुंडे,आमदार राहुल मोटे,आमदार विक्रम काळे,आमदार सतिश चव्हाण,राष्ट्रवादी महीला प्रदेश अध्यक्षा रुपालीताई चाकोतकर यांची उपस्थिती होती.पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे मराठवाडयात एका वर्षात 16 हजार शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.त्याच बरोबर दिवसेंदिवस वाढत चालल्या बेकारीमुळे.असंख्य लोकांची घरे उध्दवस्त झाली आहेत.नौक—या नाहीत म्हणुन मुलांची लग्न होत नाहीत. तरी पण सरकारला जाग येत नाही आणि मुख्यमंत्री आम्हालाच हिशो विचारतात आमच्याकडे हीशोब करायला रहाणा—यांनी आम्हाला हिशोब विचारू नये महाराष्ट्रातील बेकारीच बघावं आसा शाब्दीक  हल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री याच्यांवर केला.आम्ही सत्तेत आसताना सुध्दा अशाप्रकारची मंदी 2008—9 साली आली होती मात्र आम्ही ती देशातील जनतेला जानवू दिली नाही.लगेच त्याच्यावर मार्ग काढले.असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री यांना दिला.

विकासासाठी पक्षातंर केल तर मग 40 वर्ष काय केल.

काही दिवसापुर्वी विकासाचा मुददा समोर करत राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्या संदर्भात शरद पवार यांनी विकासासाठी पक्षातंर केल तर मग 40 वर्ष काय केल.आसा सवाल राणाजगजितसिंह पाटील यांना केला.जरी पक्षातंर केल आसलं तरी कोण कुस्ती जिंकत हे पाहुच असेही शरद पवार म्हणाले.यांना मंत्री केल यांना खासदार केल आनखी काय करायला पहीजे होत.आशा शब्दात राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर पवार यांनी टिका केली.स्वाभीमान आसता तर दुस—यांच्या पाया पडण्याची वेळ तुम्हच्यावर आली नसती आशा शेलक्या शब्दात शरद पवार यांनी   राणाजगजितसिंह पाटील यांच्या सोलापुर येथिल भाजपा प्रवेशावर निशाना साधला.

धनंजय मुडे यांची राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टिका

मुक्ती संग्राम दिवशी महाराष्ट्राला जेवडा आनंद झाला तेवडाच आनंद काही लोकांनी पक्षांतर केल्यावर तुम्हाला झाला आहे.आसे चित्र आज उस्मानाबादमध्ये मला दिसत आहे.जरी कोणी पक्ष सोडून गेल आसेल पण जो पर्यत या उस्मानाबाद जिल्हयामध्ये पवार साहेबांचा मावळा जिवंत आहे.तो पर्यत उस्मानाबाद हा राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्लाच रहाणार आहे. राजे गेले,सरदार गेले,सिेह गेले पक्षात कावळे होते तेही गेले तरी राष्ट्रवादीला काही फरक पडणार नाही.आशा शब्दात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर कडाडुन टिका केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या