उदयनराजें विरोधात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण?रिपोर्टर:

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा महाराष्ट्रभर गाजत असताना आघाडीने या ठिकानचा उमेदवार ठरवून उदयनराजेंना चांगलेच आव्हान  दिलीे आहे.काँग्रेस राष्ट्रवादीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना साता—याच्या मैदानात उतरले असुन उदयनराजेंचा पराभव करायचा असेल तर तोडीसतोड उमेदवार देण्याची काँग्रेस राष्ट्रवादीची रणनिती आहे. खासदारकीचा राजीनामा देत छत्रपती उदयनराजे भोसलेंनी भाजपची वाट धरली मात्र उदयनराजेंना धोबीपछाड देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीनं तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे. साताऱ्यात उदनयराजेंविरोधात तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना मैदानात उतरवले जाणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

विधानसभेसोबत होणाऱ्या लोकसभेच्या पोटनिवडणूकीत उदयनराजे भोसलेंचा पराभव करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं कंबर कसलीय. शरद पवारांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत उदयनराजेंना कडवं आव्हान निर्माण केलंय. साताऱ्याच्या मैदानात शरद पवार उतरणार असतील तर आपण माघार घेवु असं सांगत उदयनराजेंना अश्रू अनावर झाले पण त्याचवेळी इतरांशी लढायला कधीही तयार आहे हे सांगायला उदयनराजे विसरले नाहीत.

कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देणाऱ्या सातारा लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला आत्तापर्यंत केवळ तीनचवेळा विजय मिळवता आलेला आहे. कारण जिल्ह्यात पसरलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तगडे जाळे पहाता गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून सातारा जिल्ह्यातच सर्वात जास्त आऊटगोईंग झाले आहे त्यात छत्रपतींचे वंशज असलेल्या उदयराजेंसारख्या मातब्बर नेत्यांनी भाजपचे कमळ हाती धरल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध उदयराजे अशी लढत होणार आहे. कारण या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं एकमेकांचे हिशेब चुकते करण्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातली वर्चस्वाची लढाईसुद्धा लढली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या