तुळजाभवानी,येडेश्वरीला भक्ताकडुन चांदीचा मुकूट अर्पण
रिपोर्टर: पुणे येथील भक्ताने श्रध्देपोटी महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेस व येरमाळा येथिल येडेश्वरी देवीस चांदीचा मुकुंट अर्पण केला आहे.
पुणे येथील कोलवडी भागात खरेदी विक्रीव्यवसाय करणारे व आयुर्वेद पंचकर्म सेंंटर चालविणारे अजित रामदास कदम यांनी श्री तुळजाभवानी देवीच्या कृपा आशिर्वाद मुळे व्यवसायात वृदी होत असुन श्री तुळजाभवानी मातेच्या आर्शीवादाने संगळं काही ठीक चालत असल्याने या श्रध्देपोटी कदम यांनी श्री तुळजाभवानी मातेस आठशे ग्राम वजनाचा व येडेश्वरी मातेस सवा किलो वजनाचे टोप अर्पण केले.
गुरुवारी सकाळी अभिषेक केल्यानंतर हा चांदीचा टोप किंमत मजुरीसह 1लाख ,46 हजार रुपयाचा असुन या पुजेचे पौराहीत्य भोपेपुजारी किशोर उध्दवराव भैय्ये यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या